शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेमधील गुन्ह्यांच्या प्रमाणात वर्षागणिक वाढ

By admin | Updated: July 12, 2014 01:07 IST

2013 मध्ये याआधीच्या वर्षाच्या तुलनेत अशा घटनांचे प्रमाण 21.5 टक्क्यांनी वाढल्याची कबुली रेल्वेमंत्री डी.व्ही. सदानंद गौडा यांनी शुक्रवारी राज्यसभेत दिली.

नवी दिल्ली : रेल्वेतील गुन्ह्यांचे प्रमाण दरवर्षी वाढत असून 2क्13 मध्ये याआधीच्या वर्षाच्या तुलनेत अशा घटनांचे प्रमाण 21.5 टक्क्यांनी वाढल्याची कबुली  रेल्वेमंत्री डी.व्ही. सदानंद गौडा यांनी शुक्रवारी राज्यसभेत दिली.
काँग्रेसचे खासदार विजय दर्डा यांनी रेल्वेतील गुन्ह्यांच्या वाढत्या घटनांकडे लक्ष वेधले होते. रेल्वेत गुन्ह्यांच्या घटनांमध्ये वर्षागणिक वाढ होत असल्याची सरकारला कल्पना आहे काय, असा प्रश्न विचारत खा. दर्डा यांनी दरवर्षी सुमारे 19,क्क्क् गुन्हे घडत आहेत. हे प्रमाण त्या आधीच्या वर्षाच्या तुलनेत 5क् टक्के अधिक आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले होते.
त्यावर गौडा म्हणाले की, आधीच्या वर्षाच्या तुलनेत 5क् टक्के गुन्हे वाढतात, असे म्हणणो चुकीचे आहे. तथापि, 2क्13 मध्ये 21.5 टक्के गुन्हे वाढले. त्याबाबत त्यांनी सविस्तर आकडेवारीही दिली.  2क्11 मध्ये 22,493, 2क्12 मध्ये 21,775 आणि 2क्13 मध्ये 26,467 गुन्ह्याच्या घटना घडल्या. (यामध्ये अनुक्रमे 14,7क्1, 14,267 आणि 18,क्37 चोरीच्या घटनांचाही समावेश आहे.)
भारतीय रेल्वेतील गुन्हे रोखणो आणि गुन्ह्यांचा तपास करण्याची घटनात्मक जबाबदारी राज्य सरकारच्या गव्हर्नमेंट रेल्वे प्रोटेक्शनची (जीआरपी) आहे, असे त्यांनी नमूद केले. रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ) काही महत्त्वाच्या गाडय़ांच्या सुरक्षेसाठी आणि महत्त्वाचे आणि संवेदनशील स्थानकांवरील बंदोबस्तासाठी जीआरपीला पूरक ठरत असते. महिलांसंदर्भातील गुन्हे वाढत आहेत. एकटय़ादुकटय़ा महिलेला रेल्वेतून प्रवास करण्यास कठीण झाले आहे काय, आणि असे असेल तर महिलांच्या सुरक्षिततेसाठी रेल्वेने कोणते उपाय योजले आहेत, यावर रेल्वेमंत्र्यांनी  रेल्वे गाडय़ांमध्ये महिलांवरील गुन्हे वाढल्याची कबुली दिली; मात्र रेल्वेतून महिलांना एकटय़ाने प्रवास कठीण झाले आहे, असे म्हणणो चुकीचे असल्याचे स्पष्ट केले. (लोकमत न्यूज नेटवर्क)