शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

एसटीकडून वार्षिक सवलत कार्ड योजना बंद

By admin | Updated: April 24, 2017 03:32 IST

एसटी महामंडळाला तोट्याला सामोरे जावे लागत असतानाच, प्रवासी आणि उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी प्रवाशांसाठी असलेल्या योजना बंद केल्या जात आहेत.

मुंबई : एसटी महामंडळाला तोट्याला सामोरे जावे लागत असतानाच, प्रवासी आणि उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी प्रवाशांसाठी असलेल्या योजना बंद केल्या जात आहेत. एसटीकडून प्रवाशांच्या सोईसाठी १३ वर्षांपूर्वी वार्षिक सवलत कार्ड योजना सुरू करण्यात आली होती. त्यामुळे प्रवाशांना प्रवासात १0 टक्के सवलत मिळत होती. मात्र, ही योजना २२ एप्रिलपासून बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे वर्षाला २ ते ३ कोटींचा महसूल बुडणार आहे. एसटी महामंडळाचे प्रवासी भारमान हे ५४ टक्के आहे. महामंडळाकडून भारमान वाढवण्याचे प्रयत्न केले जात असून, नवीन बसेस व योजना आणल्या जात आहेत. तरीही प्रवासी काही केल्या वाढत नसून, महामंडळाला तोटाही होत आहे. सध्या महामंडळाचा वार्षिक संचित तोटा १,८00 कोटी रुपयांवर आहे. अशी परिस्थिती असतानाही, उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी योजनाच बंद करण्याकडे एसटीचा कल असल्याचे दिसते. प्रवाशांसाठी एसटी महामंडळाने २00३ सालापासून वार्षिक सवलत कार्ड योजना सुरू केली. या योजनेंतर्गत एक वर्ष कालावधीकरिता २00 रुपये मुल्य आकारून कार्ड देण्यात येत होते. हे कार्ड असल्यास प्रवाशाला प्रवासी तिकिटात १0 टक्के सवलत देण्यात येत होती. १८ किलोमीटर पुढील प्रवासासाठी ही सवलत लागू होती. त्यामुळे या सेवेचा प्रवाशांंना चांगलाच फायदा होत होता, तर एसटीच्या तिजोरीत वर्षाला २ ते ३ कोटी रुपयांची भर पडत होती. ही भर पडत असतानाही एसटी महामंडळाने २२ एप्रिलपासून वार्षिक सवलत कार्ड योजना बंद करण्याचा निर्णय घेतला. या योजनेत प्रवाशाला १0 टक्के सवलत दिली जात असल्याने, एसटीला नुकसान सोसावे लागत होते, हे कारण पुढे करत ही योजना बंद करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र, त्यामुळे प्रवासी संख्या कमी होण्याचीही भीती व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)