शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात एड्समुळे वार्षिक सरासरी 37 बळी

By admin | Updated: August 27, 2016 13:34 IST

गोव्यात एड्समुळे वर्षाला सरासरी 37 लोकांचा मृत्यू होतो.

ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. २७ -  राज्यात एड्समुळे वर्षाला सरासरी 37 लोकांचा मृत्यू होतो. राज्यात 1989 साली पहिला रुग्ण गोव्यात सापडला होता. गेल्या 29 वर्षात एड्समुळे सरासरी 1094 रुग्ण मृत्यू पावले आहेत. तर महिन्याला 3 रुग्णांचे मृत्यू एड्समुळे होतात. गेल्या सहा वर्षापासून राज्यात एड्च्या रुग्ण नोंदणीची संख्या कमी होत चालली आहे.
गोवा राज्य एडस नियंत्रण संस्थेला 1987 साली पहिला विदेशी नागरिक रुग्ण आढळला होता. त्यानंतर 1988 साली एक भारतीय रुग्ण मात्र तो गोमंतकीय नव्हता असा रुग्ण सापडला होता. राज्यात 1987 ते 2016 र्पयत 16 हजार 201 एडस बधित आणि एचआयव्हीग्रस्त  रुग्णांची नोंद झाली आहे. तर मे 2016 र्पयत 1 हजार 706 रुग्ण एडसबाधित आढळले आहेत. 
राज्यातील काही तालुक्यांमध्ये एचआयव्हीग्रस्त रुग्णांची संख्या जास्त आहे. यात चार समुद्रकिनारी भागातील तालुक्यांची नोंद आहे. 2015 सालात सालसेत (9.7 टक्के), वास्को (22.2 टक्के), तिसवाडी (8.5 टक्के), बार्देश (11.9 टक्के) एचआयव्हीग्रस्त रुग्णांची नोंदणी झाली आहे. तर 2015 साली एकूण 26.8 टक्के एचआयव्हीग्रस्तांची नोंदणी झाली असून यात राज्य, विदेश व इतर भागातील लोकांचा समावेश आहे. 
2015 सालात 15 ते 49 वयोगटातील 80.6 टक्के लोक एचआयव्हीग्रस्त आढळले आहेत. यात 31.2 टक्के महिलांचा समावेश आहे. महिलांचा वयोगट 15 ते 34 आढळतो. तर 36.7 टक्के पुरुष एचआयव्हीग्रस्त आढळले. 
वयोगट 35 ते 49 या वयातील 43.1 टक्के पुरुषांना एचआयव्हीची लागण झाली आहे. तर 50.4 टक्के महिला या वयोगटातील आहेत. 2011 साली एचआयव्हीचीग्रस्त रुग्णांची संख्या 106 होती. मात्र त्यानंतर दरवर्षी ही संख्या कमी होत गेलेली दिसते. 2015 साली एकूण 29 रुग्ण एचआयव्हीग्रस्त आढळले. तर 2016 जानेवारी ते मे महिन्यार्पयत 12 रुग्ण एचआयव्हीग्रस्त आढळले असल्याचा गोवा राज्य एडस नियंत्रण संस्थेच्या अहवालात स्पष्ट केले आहे. 
राज्यात 2015-16 या कालावधीत धारबांदोडा तालुक्यात एकही एचआयव्हीग्रस्त रुग्ण सापडला नाही. तर पेडणो, केपे आणि काणकोण तालुक्यात 1.8 रुग्ण 2016 साली आढळले. डिचोली तालुक्यात 2.4 तर सत्तरी 0.6, फोंडा येथे 3.0 टक्के रुग्ण आढळले. 
(प्रतिनिधी)