शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

कर्जासाठी वार्षिक ४० हजार उत्पन्नाची अट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2016 03:13 IST

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळात स्थापनेपासून बीज भांडवल कर्ज योजना सुरूअसून, त्यासाठी ४० हजार रुपये (शहरांत ५५ हजार) वार्षिक उत्पन्नाची अट

- विश्वास पाटील,  कोल्हापूरअण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळात स्थापनेपासून बीज भांडवल कर्ज योजना सुरूअसून, त्यासाठी ४० हजार रुपये (शहरांत ५५ हजार) वार्षिक उत्पन्नाची अट असल्याने तिथेच सुशिक्षित बेरोजगारांना महामंडळाचे दरवाजे बंद होतात. या महामंडळाच्या कर्ज पात्रतेचे निकषच कालबाह्य आहेत. ४० हजारांची उत्पन्नाची अट २००३ पासून आजही तशीच आहे. एवढे वार्षिक उत्पन्न असलेला तलाठ्याचा दाखला मिळत नाही. दुसरी जाचक अट म्हणजे, तुमच्या कर्जाचा बोजा जामीनदारांच्या मालमत्तेवर नोंदवला जातो. त्यामुळे अशा कर्ज प्रकरणासाठी जामीनदारच मिळत नाहीत. सरकारच्या पंधरा महामंडळांमध्ये फक्त याच महामंडळाच्या कर्जासाठी ही अट आहे. कर्ज प्रकरणे मंजूर न होण्याचे हे महत्त्वाचे कारण आहे. इतर सर्व महामंडळे कर्जाचा ठरावीक हिस्सा शंभर टक्के अनुदानाच्या स्वरुपात देतात; परंतु हे महामंडळ एक रुपयाही अनुदान म्हणून देत नाही. असे परतफेड न करायला लागणारे अनुदान दिले पाहिजे. परतफेडीचा कालावधीही फक्त पाचऐवजी दहा वर्षे हवा. कर्ज घेतल्यानंतर वर्षानंतर हप्ते सुरू व्हावेत. सध्या ते तिसऱ्या महिन्यापासूनच सुरू होतात. (समाप्त)उत्पन्नाची मर्यादा पाच लाख करामहामंडळाने लाभार्थ्याच्या उत्पन्नाची मर्यादा ४० हजारांऐवजी पाच लाख रुपये करावी, अशी लाभार्थ्यांची मागणी आहे. शिवाय, कर्जमर्यादा ५ लाखांवरून किमान १० लाखांपर्यंत करावी, उद्योगधंद्यासाठीच नुसता कर्जपुरवठा करण्यापेक्षा मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाप्रमाणे मुलांना शैक्षणिक कर्ज देण्याचीही सोय हवी, अशाही मागण्या पुढे आल्या आहेत. कौशल्य व उद्योजकता विकासमंत्री संभाजीराव पाटील-निलंगेकर यांनी त्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. शैक्षणिक कर्जमराठा समाजातील तरुण-तरुणींना उद्योगधंद्यापेक्षा शिक्षणासाठीच कर्जाची जास्त गरज आहे. कारण ज्यांच्याकडे गुणवत्ता आहे, परंतु उच्च शिक्षणासाठी आर्थिक ताकद नसल्याने अनेकांचे करिअर थांबते. महामंडळाने त्यांचा प्राधान्याने विचार करण्याची मागणी जाणकारांतून पुढे आली आहे. जातीचे आरक्षण केव्हा मिळेल तेव्हा मिळेल परंतु तोपर्यंत विकासाचे साधन म्हणून या महामंडळाला सक्षम केल्यास त्याचा या समाजाला चांगला उपयोग होऊ शकतो.