शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

मोदींच्या पुणे दौऱ्यात ‘स्मार्ट सिटी’ स्पर्धेची घोषणा

By admin | Updated: June 22, 2016 04:16 IST

स्मार्ट सिटी योजनेच्या घोषणेची वर्षपूर्ती होत असल्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी २५ जूनला पुणे दौऱ्यावर येत आहेत. यावेळी ते ‘मेक युवर सिटी स्मार्ट’ या देशव्यापी स्पर्धेची घोषणा करणार आहेत.

पुणे : स्मार्ट सिटी योजनेच्या घोषणेची वर्षपूर्ती होत असल्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी २५ जूनला पुणे दौऱ्यावर येत आहेत. यावेळी ते ‘मेक युवर सिटी स्मार्ट’ या देशव्यापी स्पर्धेची घोषणा करणार आहेत. त्याचबरोबर देशातील ९८ स्मार्ट सिटींच्या प्रोजेक्टची माहिती देणाऱ्या संकेतस्थळाचे उद्घाटनही त्यांच्या होणार आहे, अशी माहिती महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांनी दिली. मोदी यांचे २५ जून रोजी दुपारी साडे तीन वाजता लोहगाव विमानतळावर आगमन होईल. तेथून ४ वाजता ते बालेवाडी-म्हाळुंगे येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलामधील कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहचतील. तिथे लावण्यात आलेल्या स्मार्ट सिटी प्रदर्शनातील स्टॉलला ते भेट देतील. ‘मेक युवर सिटी क्लीन’ या महत्वाकांक्षी स्पर्धेची घोषणा मोदी यावेळी करतील. यामध्ये एखादा रस्ता किंवा एखादा एरिया कशा पद्धतीने विकसित करता येईल, याचे प्रस्ताव सादर करता येणार आहेत. सर्वसामान्य नागरिक व तज्ज्ञ अशा दोन पातळ्यांवर ही स्पर्धा घेतली जाणार आहे. देशभरातील स्मार्ट सिटीच्या प्रस्तावांची एकत्रित माहिती असलेल्या संकेतस्थळाचे मोदी यांच्या हस्ते उद्घाटन केले जाणार आहे. त्याचबरोबर दोन ते तीन स्मार्ट सिटीच्या महापालिकेतील अधिकारी , पदाधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे मोदी संवाद साधतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांच्या भाषणानंतर मोदी उपस्थितांशी संवाद साधणार आहेत. (प्रतिनिधी)