शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

‘फर्ग्युसन’च्या घोषणा देशविरोधी नव्हत्या

By admin | Updated: March 26, 2016 01:47 IST

अभाविप आणि आंबेडकरी विचारांच्या विद्यार्थी संघटनांमध्ये झालेल्या गोंधळादरम्यान दिल्या गेलेल्या घोषणा देशविरोधी अथवा देशविघातक नव्हत्या, असा निर्वाळा पोलिसांनी दिला असून

पुणे : अभाविप आणि आंबेडकरी विचारांच्या विद्यार्थी संघटनांमध्ये झालेल्या गोंधळादरम्यान दिल्या गेलेल्या घोषणा देशविरोधी अथवा देशविघातक नव्हत्या, असा निर्वाळा पोलिसांनी दिला असून, गृहविभागाला याबाबतचा पाठवला आहे. घोषणा देशविरोधक होत्या की नव्हत्या याविषयावरुन गदारोळ उठलेला असतानाच पोलिसांनी हा अहवाल दिल्यामुळे नव्या चर्चेला तोंड फुटण्याची शक्यता आहे.फर्ग्युसन महाविद्यालयात मंगळवारी अभाविपच्या जेएनयू शाखेचा अध्यक्ष आलोक सिंग याचे व्याख्यान आयोजित केले होते. हा कार्यक्रम विनापरवाना होता. त्यानंतर आंबेडकरी आणि डाव्या विचारधारेच्या विद्यार्थ्यांनी हा कार्यक्रम बंद पाडण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर दोन्ही बाजूंच्या विद्यार्थ्यांची हमरीतुमरी झाली होती. महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी डेक्कन पोलिसांना देशविरोधी घोषणाबाजी झाल्याचे पत्र देत कारवाई करण्याची मागणी केली होती. मात्र, जितेंद्र आव्हाड यांनी या वादात उडी घेतल्यानंतर प्राचार्यांनी घुमजाव करीत प्रिंटींग मिस्टेक असल्याचे सांगून हे पत्रच मागे घेतले होते.दोन दिवस चाललेल्या या गोंधळामध्ये देशविरोधात घोषणाबाजी झाली किंवा नाही, याबाबतचा तसेच एकूणच प्रकरणाचा अहवाल पोलिसांनी गृहविभागाला पाठवला आहे. ज्या घोषणा पोलिसांसमोर आल्या आहेत, त्यामध्ये एकही घोषणा देशविरोधात असल्याचे निदर्शनास आलेले नाही. दोन्ही बाजूचे कार्यकर्ते व विद्यार्थ्यांनी कोणाच्याही भावना दुखावतील अशा आणि देशविघातक घोषणा दिल्याचे आढळून आले नसल्याचे उपायुक्त तुषार दोषी यांनी सांगितले. प्राचार्य रवींद्रसिंह परदेशींवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी भारिप बहुजन महासंघ, मैत्री सोशल फाऊंडेशन, दलित युवक आंदोलन, रिपब्लिकन संघर्ष दल, तथागत प्रेरणा ट्रस्टच्यावतीने करण्यात आली आहे. प्राचार्यांची भूमिका संशयास्पद असून, सांस्कृतिक पुण्यातील वातावरण गढूळ झाले असून बरेच प्रश्न अनुत्तरीत असल्याचे पोलीस आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. (प्रतिनिधी)