शहरं
Join us  
Trending Stories
1
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
2
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
3
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
4
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
5
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
8
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
9
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
10
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
11
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
12
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
13
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
14
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
15
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
16
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
17
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
20
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा

ज्येष्ठ नागरिक धोरण जाहीर करा

By admin | Updated: September 20, 2016 04:00 IST

राज्य सरकारप्रमाणे कल्याण-डोंबिवली महापालिकेनेही ज्येष्ठ नागरिकांसाठी आपले धोरण जाहीर करावे

कल्याण : राज्य सरकारप्रमाणे कल्याण-डोंबिवली महापालिकेनेही ज्येष्ठ नागरिकांसाठी आपले धोरण जाहीर करावे, या प्रमुख मागणीसह अन्य प्रलंबित मागण्यांसाठी डोंबिवलीतील ज्येष्ठ नागरिक महापालिकेच्या डोंबिवली विभागीय कार्यालयावर बुधवार, २१ सप्टेंबरला मोर्चा काढणार आहेत. ज्येष्ठ नागरिक धोरणानुसार महापालिका रुग्णालयात ज्येष्ठांसाठी स्वतंत्र कक्ष असावा, तेथे योग्य उपचार मिळावेत. डोंबिवलीतील बालभवन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह, महापालिकेच्या मालकीची अन्य सभागृहे सवलतीच्या दरात मिळावीत. विरंगुळा केंद्रे स्थापन करावीत. विक्रेत्यांनी व्यापलेली पदपथे मोकळी करावीत. १५ जून ज्येष्ठ नागरिक छळप्रतिबंधक-जागृती दिवस, २१ सप्टेंबर जागतिक स्मृतिभ्रंश दिवस आणि १ आॅक्टोबर जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवस हे तीन दिवस केडीएमसीने विविध उपक्रमांद्वारे साजरे करावेत. महापालिकेच्या अंदाजपत्रकात ज्येष्ठांसंदर्भात आर्थिक तरतूद करावी, आदी मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे. महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ (फेस्कॉम), कोकण प्रादेशिक विभाग यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढला जाणार आहे. चार वर्षांपूर्वी महासंघाने ज्येष्ठ नागरिकांच्या मागण्यांचे निवेदन केडीएमसीच्या आयुक्तांना सादर केले होते. परंतु, प्रदीर्घ काळ उलटूनही या मागण्यांबाबत कोणतीही कार्यवाही न झाल्याने बुधवारचा मोर्चा काढला जाणार आहे, अशी माहिती अध्यक्ष रमेश पारखे यांनी दिली. सरकारी धोरणाचा भाग असलेल्या मागण्या प्रलंबित राहिल्याने ज्येष्ठ नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे. डोंबिवली शहरातील १९ ज्येष्ठ नागरिक संघटनांनी या निषेध मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन केल्याचे पारखे म्हणाले. (प्रतिनिधी)