शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

भारती विद्यापीठाचा वर्धापनदिन उत्साहात साजरा

By admin | Updated: May 10, 2014 20:33 IST

माजी विद्यार्थ्यांची उपस्थिती आणि स्नेहांकितांचा शुभेच्छांचा वर्षाव... अशा उत्साहाच्या वातावरणात शनिवारी भारती विद्यापीठाचा ५०वा वर्धापनदिन साजरा झाला.

पुणे : ढोलताशांच्या गजरात विद्यार्थ्यांनी केलेला जल्लोष, कुलपतींनी जागविलेल्या विद्यापीठाच्या स्थापनेपासूनच्या आठवणी, माजी विद्यार्थ्यांची उपस्थिती आणि स्नेहांकितांचा शुभेच्छांचा वर्षाव... अशा उत्साहाच्या वातावरणात शनिवारी भारती विद्यापीठाचा ५०वा वर्धापनदिन साजरा झाला. वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये विद्यापीठाचे संस्थापक, कुलपती व वनमंत्री डॉ. पतंगराव कदम, कुलगुरू डॉ. शिवाजीराव कदम, कार्यवाह डॉ. विश्वजित कदम, कार्याध्यक्ष आनंदराव पाटील, उपाध्यक्ष डॉ. इंद्रजित मोहिते, ॲड. रावसाहेब शिंदे, डॉ. उत्तमराव भोईटे, डॉ. एस. एफ. पाटील आदी यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमामध्ये विशेष शैक्षणिक प्राविण्य मिळविलेले विद्यार्थी, राष्ट्रीय सेवा योजना, कला व क्रीडा क्षेत्रात नैपुण्य प्राप्त केलेले विद्याथी यांंच्या सन्मानाबरोबरच संस्थेमध्ये विशेष कार्य केलेल्या शिक्षक-शिक्षकेतर सेवकांना सेवागौरव पुरस्कार देण्यात आला. यावेळी बोलताना डॉ. पतंगराव कदम म्हणाले, विविध क्षेत्रातील स्पर्धा आणि गुणवत्तेचे महत्व लक्षात घेवून भारती विद्यापीठाने पुढील ५० वर्षांचा विकास आराखडा तयार केला आहे. स्वप्न पाहणे आणि ते स्वप्न सत्यात उतरल्याचा अनुभव घेणे हे भाग्य खुप कमी लोकांच्या वाट्याला येते ते माझ्या वाट्याला आले आहे. डॉ. शिवाजीराव कदम यांनी शिक्षक पेशात काम करण्यासाठी उत्सुक असणार्‍यांची संख्या कमी होत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली. प्रा. के. डी. जाधव यांनी आभार मानले. डॉ. विवेक रणखांबे, डॉ. ज्योती मंडलिक यांनी कार्यक्रमाचे सुत्रलसंचालन केले.