शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs DC : दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली; पण पावसाच्या बॅटिंगमुळे हैदराबाद फक्त बॉलिंग करून 'आउट'
2
"९० हजार सैनिकांचे पायजमे आजही तिथे टांगलेले आहेत’’, मुनीर आणि पाकिस्तानचं बलूच नेत्याकडून वस्रहरण   
3
IPL 2025 Playoffs Race : आता ४ जागेसाठी ७ दावेदार! कोणत्या संघासाठी कसे आहे प्लेऑफ्सचे समीकरण?
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
5
दोन्ही दिल्लीकर एकाच क्रीजमध्ये; रन आउटसाठी स्टँडमध्ये काव्या मारनची 'दातओठ खात' तळमळ (VIDEO)
6
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
7
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
8
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
9
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
10
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
11
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
12
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
13
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
14
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
15
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
16
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
17
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
18
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
19
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
20
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला

अणेंचा राजीनामा

By admin | Updated: March 23, 2016 04:31 IST

विदर्भासोबत मराठवाडाही वेगळा करायला हवा, असे वक्तव्य करून राजकीय पक्षांच्या टीकेचे धनी बनलेले श्रीहरी अणे यांनी अखेर महाधिवक्ता पदाचा राजीनामा राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्याकडे सुपुर्द केला

मुंबई : विदर्भासोबत मराठवाडाही वेगळा करायला हवा, असे वक्तव्य करून राजकीय पक्षांच्या टीकेचे धनी बनलेले श्रीहरी अणे यांनी अखेर महाधिवक्ता पदाचा राजीनामा राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्याकडे सुपुर्द केला. राज्यपालांनी तो मंजूर केला. अणेंच्या राजीनाम्यामुळे राज्यात उठलेले राजकीय वादंग थंडावले आहे.अपेक्षेनुसार अणे यांनी सोमवारी सकाळी १०.३० सुमारास राजभवनावर जाऊन राज्यपालांकडे राजीनामा सादर केला. सकाळी ११ वाजता विधानसभेचे कामकाज सुरू होताच विरोधकांसह शिवसेनेच्या सदस्यांनी अणे यांच्यावर कारवाईची मागणी करीत घोषणाबाजी सुरू केली. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी अणे यांचा राजीनामा राज्यपालांनी स्वीकारला का, अशी विचारणा केली. यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, महाधिवक्त्यांनी राज्यपालांकडे राजीनामा द्यावा, अशी कायदेविषयक तरतूद आहे. याबाबतचा अंतिम निर्णय राज्यपाल घेतात. राज्यपालांकडे राजीनामा सोपविल्यानंंतर तो ते स्वीकारतात किंवा मंत्रिमंंडळाचे मत मागवितात. राज्यपालांनी मंत्रिमंडळाला अशी विचारणा केली तर राजीनामा स्वीकारण्यात यावा, अशी शिफारस मंत्रिमंडळ करेल, असे स्पष्ट केले. मुख्यमंत्र्यांच्या या खुलाशानंतर अणेंवरून उठलेले राजकीय वादळ शांत झाले. चौभाजन करा - मा.गो. वैद्यमहाराष्ट्राची एक-दोन नव्हे, तर चार तुकडे पाडा आणि चार नव्या राज्यांची निर्मिती करा, अशी भूमिका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रवक्ते मा.गो. वैद्य यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना मांडली. ते म्हणाले, संघाच्या परिभाषेत महाराष्ट्राचे चार प्रांत आहेत. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि देवगिरी अर्थात मराठवाडा-खान्देश अशी संघाने महाराष्ट्राची विभागणी पूर्वीच केली आहे. हे चार प्रांतच स्वतंत्र राज्य म्हणून अस्तित्वात यावेत, अशी वैद्य यांची मागणी आहे. > मी सरकारचा नव्हे लोकांचा वकील होतोवेगळ्या विदर्भाची वारंवार मागणी करत वेगळ्या मराठवाड्याचीही कल्पना मांडून टीकेचे धनी झालेल्या राज्याचे महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी अखेर राजीनामा दिला आहे. राजीनामा देताना मी राज्य सरकारची बाजू मांडणारा नसून, लोकांची बाजू मांडणारा होतो, असे स्पष्ट करत विधिमंडळाचे कामकाज ठप्प करणाऱ्या आमदारांवरही त्यांनी निशाणा साधला आहे. आमदारांनी कामकाज ठप्प पाडण्यापेक्षा समस्या सोडविण्याचा विचार केला पाहिजे, अशा शब्दांमध्ये आमदारांवर त्यांनी टीका केली आहे.महाधिवक्ता आता कोण?श्रीहरी अणे यांनी राजीनाम्यानंतर आता महाधिवक्ता पदासाठी ज्येष्ठ विधिज्ञ राम आपटे, अ‍ॅड. अनिल साखरे, अ‍ॅड. आशुतोष कुंभकोणी आणि अ‍ॅड. मिलिंद साठे यांच्या नावांची चर्चा असल्याचे सरकारमधील सूत्रांनी सांगितले. अ‍ॅड. आपटे हे रा.स्व. संघाच्या जवळचे मानले जातात. त्यांचे ज्येष्ठ बंधू बाळासाहेब आपटे हे भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष होते. ज्येष्ठ विधिज्ञ आशुतोष कुंभकोणी आणि अनिल साखरे यांनी सरकारच्या मोठ्या केसेस लढल्या आहेत. शिवाय, अल्प काळासाठी त्यांनी उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणूनही कामकाज पाहिले आहे. हे तर संघाचे डावपेच - राज ठाकरेराज्य तोडण्याचे काम अणेंपेक्षा रा.स्व. संघ आणि भाजपाच अधिक करीत आहेत. हे मनसुबे त्यांच्याच मनातील आहेत. अणे यांचा बोलविता धनी संघ-भाजपाच आहे. छोट्या राज्यांची कल्पना संघाची आहे. भाजपा तीच पुढे नेत आहे. त्यातही अणे नागपूरचे असून त्यांच्या मनात नसतानाही त्यांना महाधिवक्ता पदावर बसविण्यात आले होते. संघाला अपेक्षित काम त्यांनी केले आणि आता राजीनामा देऊन मोकळे झाले. - राज ठाकरे, मनसेप्रमुख> अखेर सरकारची डोकेदुखी टळली...जालना येथे रविवारी मराठवाडा मुक्ती मोर्चाच्या एका कार्यक्रमात बोलताना महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी वेगळ्या विदर्भासोबतच मराठवाड्याचेही वेगळे राज्य करण्याच्या मागणीचे समर्थन केले होते. अणे यांच्या या वक्तव्याचे तीव्र पडसाद सोमवारी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत उमटले होते. विरोधकांसह शिवसेनेने अणे यांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक भूमिका घेतल्यामुळे सरकारची कोंडी झाली होती. शिवसेनेने तर अणे यांचा राजीनामा होईपर्यंत मंत्री बैठकांना जाणार नाहीत, असा इशारा दिला होता. अणे यांना महाधिवक्ता या पदावरून दूर करावे, असे ठराव राष्ट्रवादी व शिवसेनेकडून मांडण्यात आले होते. अणे यांच्या राजीनाम्याबाबत काही निर्णय न झाल्यास या ठरावावर चर्चा घेण्याची मागणी विरोधकांसोबत शिवसेनेकडूनही केली जाणार होती. तसे झाले असते तर सरकारची अडचण आणखीनच वाढली असती. मात्र, अणे यांनी यापूर्वीच राजीनामा दिल्याने सरकारची डोकेदुखी टळली.