शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

अण्णासाहेब जगतापने पटकावला महापौर कुस्ती चषक

By admin | Updated: March 7, 2017 02:19 IST

महापौर चषक कुस्ती स्पर्धेत सोलापूरच्या अण्णासाहेब जगताप याने स्पर्धेचे खुल्या गटाचे विजेतेपद पटकावले आहे.

नवी मुंबई : महापालिकेच्या वतीने आयोजित महापौर चषक कुस्ती स्पर्धेत सोलापूरच्या अण्णासाहेब जगताप याने स्पर्धेचे खुल्या गटाचे विजेतेपद पटकावले आहे. भोलानाथ साळवी हा कुमार गटातील स्पर्धेचा मानकरी ठरला आहे. कोपरखैरणेत दोन दिवस चाललेल्या या कुस्ती स्पर्धेत राज्यभरातील २८० कुस्तीगिरांनी सहभाग घेतला होता. स्पर्धा पाहण्यासाठी हजारो प्रेक्षकांनी गर्दी केली होती.महापालिकेच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही महापौर चषक कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्याकरिता कोपरखैरणे येथील रा. फ. नाईक विद्यालयाच्या मैदानावर कुस्तीचा भव्य आखाडा उभारण्यात आला होता. त्याठिकाणी दोन दिवस कुस्तीचे अटीतटीचे सामने खेळले जात होते. या सामन्यांची अंतिम फेरी रविवारी झाली. यामध्ये खुल्या गटाच्या महापौर चषक स्पर्धेत सोलापूरच्या अण्णासाहेब जगताप याने सोलापूरच्याच गणेश जगताप याला चीतपट करत स्पर्धेचे विजेतेपद पटकावले, तर अठरा वर्षांखालील कुमार गटातून भोलानाथ साळवी याने अजय भोईर याच्यावर मात करत मैदान मारले. या दोन्ही विजेत्यांसह उपविजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. अण्णासाहेब जगताप याला १ लाख रुपये, मानाचा पट्टा व चांदीची गदा पुरस्कार स्वरूपात देण्यात आली. तर भोलानाथ साळवी याला १५ हजार रुपये व चांदीची गदा देवून सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रमास समाजकल्याण व झोपडपट्टी सुधार समिती सभापती रमेश डोळे, क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम समिती उपसभापती श्रध्दा गवस, नगरसेवक देविदास हांडे पाटील,सुनील पाटील, नगरसेविका छाया म्हात्रे, वैशाली नाईक, महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे उपाध्यक्ष सर्जेराव मोरे, खजिनदार सुरेश पाटील, महापालिका क्रीडा अधिकारी रेवप्पा गुरव, मारुती आडकर आदी उपस्थित होते. स्पर्धेच्या माध्यमातून शहरातील कुस्तीगिरांना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने महापालिकेतर्फे या स्पर्धेचे आयोजन केले जात आहे. कुस्तीमध्ये महिलांचाही वाढता प्रतिसाद पाहता, ठाणे व रायगड जिल्हास्तरीय विशेष गटात स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेत मनाली जाधव हिने भाग्यश्री भोईर हिच्यावर मात करत विजेतेपद पटकाविले, तर ममता राठोड हिने तृतीय व मोनिका चिकणे हिने चतुर्थ क्रमांक पटकावला आहे. (प्रतिनिधी)खुल्या गटाच्या स्पर्धेत सोलापूरचा दत्ता नरळे हा तिसरा, सांगलीचा रणजित पवार चौथ्या क्रमांकाचे मानकरी ठरले आहेत.कुमार गटात विकास पिसाळ तिसऱ्या तर दर्शन पाटील हा चौथ्या क्रमांकाचा मानकरी ठरला आहे.त्याशिवाय ५५ ते ६५ किलो वजनी गटातून राहुल जाधव हा विजेता ठरला असून, विकास कदम उपविजेता, सुधीर पाटील तृतीय तर नानासाहेब होनमाने चतुर्थ क्रमांकाचा विजेता ठरला आहे.४५ ते ५० किलो वजनी गटातून शरद साठे विजेता, चेतन मालपुरे उपविजेता, दीपक मालपोटे तृतीय, यश पाटील चतुर्थ क्रमांकाचे मानकरी ठरले आहेत.६१ ते ७० किलो गटातून लखन म्हात्रे विजेता, विजय म्हात्रे उपविजेता, मंगेश पाटील तृतीय तर भरत हरगुले चौथ्या क्रमांकाचा विजेता ठरला आहे.४५ ते ५० किलो वजनी गटातून दर्शन पाटील प्रथम, अनिकेत मढवी द्वितीय, विवेक भंडारी तृतीय तर चेतन चव्हाण चतुर्थ क्रमांकाचे मानकरी ठरले आहेत.६५ ते ७४ किलो राज्यस्तरीय गटातून सांगलीच्या प्रकाश कोळेकर याने नवी मुंबईच्या नितीन संकपाळ याच्यावर मात करत गटाचे विजेतेपद पटकावले. या स्पर्धेत विजय पाटील तृतीय तर विजय सुरडे चौथ्या क्रमांकाचे विजेते ठरले आहेत.