शहरं
Join us  
Trending Stories
1
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
3
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
4
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
5
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
6
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
7
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
8
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
9
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
10
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
11
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
12
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
13
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
14
भाडेकरार, भाडेवाढीशिवाय घरे रिकामी करणार नाही; नायगाव बीडीडी प्रकल्पग्रस्तांचा म्हाडाला कडक इशारा
15
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
16
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
17
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
18
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
19
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
20
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं

अण्णांचे दिल्लीत पुन्हा आंदोलन!

By admin | Updated: January 29, 2015 03:27 IST

पंतप्रधानांच्या बोलण्यात आणि कृतीत मोठा फरक असून, निवडणूक प्रचारात घोषित केलेल्या काळ्या पैशांचे काय झाले,

पारनेर (जि. अहमदनगर) : पंतप्रधानांच्या बोलण्यात आणि कृतीत मोठा फरक असून, निवडणूक प्रचारात घोषित केलेल्या काळ्या पैशांचे काय झाले, असा थेट सवाल उपस्थित करत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिल्लीत पुन्हा एकदा आंदोलन छेडणार असल्याचे जाहीर केले आहे.राळेगणसिद्धीत बुधवारी पत्रकारांशी बोलताना अण्णांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारला लक्ष्य करत भ्रष्टाचार, सक्षम लोकपाल, शेतकरीविरोधी कायदे आणि काळा पैसा आदी विषयांबाबत सरकार गंभीर नसल्याचे स्पष्ट केले़ लोकपाल विधेयकावर राष्ट्रपतींनी स्वाक्षरी करून वर्ष लोटले आहे़ याबाबत पंतप्रधान मोदी यांना दोनदा आठवण करून दिली़ त्यांनी मात्र, काहीच हालचाल केल्याचे दिसत नाही़ सरकारच्या या कार्यपद्धतीवर नाराज असल्याचे सांगत अण्णा म्हणाले की, पूर्वीच्या काँग्रेस सरकारने जनतेची फसवणूक केल्याने जनतेला बदल हवा होता़ त्यानंतर आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून सर्व भारतीयांना मोठ्या अपेक्षा होत्या़ ते भ्रष्टाचार विरोधी लढ्याला प्राधान्य देतील असे वाटले होते़ मात्र, मोदी यांच्या बोलण्यात व कृतीत मोठा फरक असून, ते केवळ बोलतात कृती काहीच करत नाही़ मोदींनी भ्रष्टाचारमुक्त भारत व परदेशातील काळा पैसा देशात आणला जाईल, असे आश्वासन दिले होते. आता या आश्वासनाचे काय झाले? असा सवाल अण्णांनी केला. मोदी यांनी काळा पैसा तर आणला नाहीच पण सक्षम लोकपाल कायदा होण्याबाबतही कोणत्याही हालचाली केल्या नाहीत. तसेच जमीन अधिग्रहणाचा केलेला कायदाही शेतकऱ्यांच्या विरोधी आहे़ या प्रश्नांवर आवाज उठविण्यासाठी आपण पुन्हा दिल्लीत आंदोलन करण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)