शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

अण्णाभाऊ साठे घोटाळा तब्बल ३८५ कोटींचा!

By admin | Updated: June 5, 2015 01:53 IST

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळातील घोटाळा तब्बल ३८५ कोटी रुपयांहून अधिक असल्याचे समोर आले आहे. मात्र अद्याप पोलिसांनी एकालाही अटक केलेली नाही.

१३२ कोटी रुपयांची खैरात : या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक नाहीयदु जोशी - मुंबईलोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळातील घोटाळा तब्बल ३८५ कोटी रुपयांहून अधिक असल्याचे समोर आले आहे. मात्र अद्याप पोलिसांनी एकालाही अटक केलेली नाही. राष्ट्रवादीचे सोलापूर जिल्ह्यातील आमदार रमेश कदम हे या महामंडळाचे अध्यक्ष असतानाच्या काळात हा घोटाळा झाला आहे. कदम यांनी स्वत: अध्यक्ष असलेल्या कारखान्यांना महामंडळातून थेट १३२ कोटी रुपयांची खैरात वाटली. आकडेवारी अशी : जोशाबा मध्यवर्ती ग्राहक सहकारी संस्था; बोरीवली या संस्थेस १ नोव्हेंबर २०१३ रोजी (चेक क्र. ७४१२६३) २४ कोटी रुपये दिले गेले. २ नोव्हेंबर २०१३ रोजी (चेक क्र. ७४१२६६) १० कोटी देण्यात आले. २७ मार्च २०१४ रोजी  (चेक क्र. ७४१७०५) ५ कोटी रुपये दिले गेले. १० नोव्हेंबर २०१४ रोजी (चेक क्र. ७२८७४७) तब्बल २० कोटी रुपये देण्यात आले. आता दुसरे उदाहरण - लोकशाहीर अण्णाभाऊ साठे मागासवर्गीय सूतगिरणी पैठण; जि. औरंगाबाद यांना २८ जुलै २०१४ रोजी ५२ कोटी ७८ लाख ७७ हजार रुपये (चेक क्र. ७२८६८४) तर ४ आॅगस्ट २०१४ रोजी (चेक क्र. ७२८७९९) ८ कोटी ९५ लाख २३ हजार रुपये देण्यात आले. मैत्रिय शुगर असोसिएशन; वैजापूर जि. औरंगाबाद यांना १६ आॅक्टोबर २०१४ रोजी चेक क्र. ७२८७४२द्वारे ३० कोटी रुपये दिले. आता हे बघा - २०१४-१५ या एकाच वर्षात ९ कोटी १५ लाख ५० हजार ३६६ रुपये किमतीच्या ५७ जणांना ५७ महागड्या गाड्या राज्यातील काही व्यक्तींना नियमबाह्यरीत्या वाटण्यात आल्या. त्यासाठी कोणतीही योजना नव्हती. या महनीयांना देण्यात आलेल्या गाड्यांची किंमत प्रत्येकी ८ लाख ते २० लाख रुपयांच्या घरात होती. यांना वाटल्या महागड्या गाड्या : वामन सावदास खंडाळे (नाशिक), प्रवीण रावसाहेब भारस्कर, सुनील रामचंद्र उमाप, अशोक भाऊसाहेब रोकडे (अहमदनगर), रोहिदास विलास साळुंके, आनंद अशोक कांबळे (पुणे), संतोष कृष्ण जाधव (बारामती), मच्छिंद्र ज्ञानू सकटे (सातारा), बाळासाहेब प्रभाकर साठे, दिलीप नामदेव देवकुळे, कल्याण सौदागर मोरे, किशोर अशोक कांबळे, पांडुरंग गोविंद कदम, सुनील सुभाष चव्हाण, रवींद्र महादेव वाघमारे, धनाजी ज्ञानदेव वाघमारे (सगळे जि. सोलापूर), सुरेश एकनाथ फाजगे, धर्मराज तुकाराम मिसाळ, सुभाष नागोजी मिसाळ, संभाजी माधवराव संभाळकर, शिवाजी रामभाऊ घोडके, लहू नामदेव सरोदे, कडुबा सुंदरलाल मावस (सर्व जि. औरंगाबाद), संजय नारायण कांबळे, राजेंद्र गणेश थोरात, कैलाश रामदास पाजगे, योगिराज तुकाराम मिसाळ (सर्व जि. जालना), बाबा एस. सुतार, विजय सूर्यभान साठे, रामेश्वर केरू घोरपडे, दीपक इंदर थोरात, शरद यादव लोखंडे, सुमित्रा नाना थोरात, संतोष वैजनाथ पाटोेळे, राम धर्मराज जोगदंड, बाबू यशवंत गायकवाड, एकनाथ आव्हाड (सर्व जि. बीड), रमेश हरीभाऊ आमटे (अमरावती). यांना वाटल्या महागड्या गाड्यासंतोष नागनाथ कदम, संजय दीपक साठे, विजय रामकृष्ण कसबे, व्यंकट महादू शिंदे, सतीश वाघमारे, सचिन बाळू साळवे, नामदेव बाळू खलसे, राजेंद्र दत्तात्रय गायकवाड, भारत ज्ञानदेव गायकवाड, दशरथ विनोद कसबे, उत्तम हनुमंत खंडागळे, दिलीप चंद्रकांत खंदारे, सोमनाथ गोरख खिलारे, प्रवीण बबन कारके, राम महादू शिंदे, पद्माकर बाबूराव सूर्यवंशी, त्रिमुख बाबू खलसे, गणपत नरसिंग वाघमारे, गोरख मनोहर साठे (सगळे रा. वांद्रे; मुंबई).याशिवाय, कर्मचारी भरती, रमेश कदम यांच्या नातेवाइकांनी उचललेले पैसे, बोगस कर्जवाटपाची हजारो प्रकरणे, अधिकाऱ्यांनी केलेली कोट्यवधी रुपयांची उचल अशी अनेक मती गुंग करणारी प्रकरणे आहेतच. हे सगळे घोटाळे ३८५ कोटींच्या घरात जातात.