शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

अण्णांना पदावरून हटविले

By admin | Updated: January 8, 2016 03:41 IST

भ्रष्टाचाराविरोधात आंदोलन उभारणारे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यासह सर्व विश्वस्तांना राळेगणसिध्दी येथील ‘भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास’ या संस्थेच्या विश्वस्तपदावरून हटवून

पुणे : भ्रष्टाचाराविरोधात आंदोलन उभारणारे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यासह सर्व विश्वस्तांना राळेगणसिध्दी येथील ‘भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास’ या संस्थेच्या विश्वस्तपदावरून हटवून प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. संस्थेच्या नावातील ‘भ्रष्टाचार’ हा शब्द न वगळल्याने धर्मादाय सहआयुक्तांनी ही कारवाई केली. भ्रष्टाचाराचे निर्मूलन करणे हे शासनाचे काम आहे. त्यामुळे कोणत्याही संघटना, संस्था आपल्या नावामध्ये ‘भ्रष्टाचार निर्मूलन’ हे शब्द वापरू शकत नाहीत. त्यामुळे असे शब्द असलेल्या संस्थांनी नावात बदल करून संबंधित शब्द त्वरीत हटवावेत, असा आदेश उच्च न्यायालयाने दिला होता. ‘भ्रष्टाचार निर्मूलन’ शब्द असलेल्या आणि धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे नोंद असलेल्या संघटनांना सहआयुक्तांनी नोटिसा पाठवली होती. हजारे यांच्या भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन न्यास या संस्थेच्या नावातही ‘भ्रष्टाचार’ हा शब्द असल्याने तो बदलण्याचा आदेश देण्यात आला होता. मात्र नावात बदल करण्यात आला नाही. त्यामुळे धर्मादाय सहआयुक्त शिवकुमार डिगे यांनी महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम १९५० चे कलम ६९, कलम ३ अ व ५० अ नुसार संघटनेच्या विश्वस्तांवर कारवाई करीत हजारे यांच्यासह सर्व विश्वस्तांना निलंबित केले. तसा आदेश गुरुवारी काढला. हजारे यांच्या वतीने त्यांचे म्हणणे अ‍ॅड. मिलिंद पवार यांनी मांडले. या प्रकरणाचा अंतिम निकाल लागेपर्यंत विश्वस्त निलंबित राहणार असल्याने आदेशात म्हटले आहे.