शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

बेदी, केजरीवालांसाठी अण्णा ‘नॉट रिचेबल’!

By admin | Updated: January 21, 2015 01:27 IST

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या किरण बेदी आणि आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल या दोन माजी शिष्यांना ज्येष्ठ समाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी चार हात लांबच ठेवले अ

रघुनाथ पांडे - नवी दिल्लीदिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या किरण बेदी आणि आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल या दोन माजी शिष्यांना ज्येष्ठ समाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी चार हात लांबच ठेवले असून ते फोनही त् घेत नसल्याचे समजते.दिल्ली निवडणुकीच्या निमित्ताने आपचे नेते अरविंद केजरीवाल आणि भाजपावासी किरण बेदी या दोन अण्णांच्या माजी शिष्यमोत्तांमध्ये सामना रंगत आहे. ‘अण्णाजी का आशीर्वाद मिला है’, असे दोघेही सांगत असले, तरी प्रत्यक्षात मात्र अण्णांनी स्वत:ला दिल्लीपासून दूरच ठेवले आहे. किरण बेदी भाजपामध्ये गेल्याचे अण्णांना रुचले नाही.भाजपात प्रवेश करण्यापूर्वी बेदी यांनी मला फोनवरून किंवा अन्य कोणत्याही प्रकारची चर्चा केली नाही. आमच्या शेवटच्या आंदोलनानंतर त्या राळेगणसिद्धीतही आल्या नाहीत आणि त्यांनी कधी संपर्कही केला नाही, असे अण्णांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना सांगितले.याबाबत बेदी म्हणाल्या अण्णांची फोनलाईन सध्या व्यस्त असून, ते माझे फोन घेत नाहीत. त्यांना जेव्हा कळेल की मी भाजपात का आली, तेव्हा ते फोन नक्की घेतील. तर केजरीवाल म्हणाले, अण्णांशी कोणतीच चर्चा झालेली नाही. पण त्यांचे आशीर्वाद जरूर घेईन. मला खात्री आहे, ते माझ्या डोक्यावर हात ठेवून एक सुखद संदेश साऱ्यांसाठी देतील. केजरीवाल यांनी दोन दिवसांत भरपूर वेळा राळेगणसिध्दीला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी अण्णांचे आशीर्वाद मिळावे म्हणून एकदा तरी बोलणे व्हावे यासाठी एका मध़्यस्थामार्फत चंग बांधला पण अण्णांनी दाद दिली नाही.