शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
2
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
3
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
5
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
6
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
7
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
9
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
10
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
11
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
12
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
13
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
14
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
15
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
16
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
17
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
18
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
19
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
20
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 

अण्णा हजारे पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांचे हस्तक - शेतकरी नेते जयाजीराव सूर्यवंशी

By admin | Updated: June 2, 2017 17:44 IST

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शेतकरी संपाला पाठिंबा दर्शवला आहे. मात्र, अण्णा हजारे यांच्या मध्यस्थीची गरज शेतकरी संघटनेला नाही, असे किसान क्रांतीचे जयाजीराव सूर्यवंशी म्हणाले आहेत.

ऑनलाइन लोकमत
अहमदनगर, दि. 2 -ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शेतकरी  संपाला पाठिंबा दर्शवला आहे.  मात्र, अण्णा हजारे यांच्या मध्यस्थीची गरज शेतकरी संघटनेला नाही, असे किसान क्रांतीचे जयाजीराव सूर्यवंशी म्हणाले आहेत.  
 
 शेतकरी संपाला अण्णा हजारे यांच्या पाठिंब्याची गरज नाही. ते आंदोलनादरम्यान आणि आंदोलनानंतर जराही फिरकले नाहीत. आता आंदोलन एका मोठ्या वळणावर आले असता ते मध्यस्थी करत आहेत. पण त्यांनी किसान क्रांतीच्या सदस्यांना मध्यस्थी करताना विचारले आहे का?, असाही प्रश्न सूर्यवंशी यांनी उपस्थित केला आहे. 
 
खरं तर राज्यात अनेक शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असताना ते एका आत्महत्या केलेल्या शेतक-याच्या कुटुंबीयांना भेटले नाहीत.  खरं तर अण्णा हजारे हे  पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांचे हस्तक आहेत, असा आरोपही सूर्यवंशी यांनी केला आहे.  
 
""अण्णांनी आमची वकिली करू नये. आम्ही शेतकरी आमची वकिली करण्यास समर्थ आहोत,  असेही जयाजीराव सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले आहे.  
 
 
""शेतकऱ्यांच्या शेतीमालाला खर्चावर आधारित हमी भाव मिळत नाही. अशा परिस्थितीत शेतीचे उत्पन्न वाढवण्यासाठी बँकेकडून घेतलेले कर्ज किंवा इतर खासगी कर्ज शेतकरी फेडू शकत नसल्यामुळे नैराश्यातून शेतकरी आत्महत्या करतो.
 
जेव्हा सहन करण्याची क्षमता संपते तेव्हा शेतकरी नाइलाजास्तव रस्त्यावर उतरतो आणि सरकारला विनंती करुन सांगतो की मी माझ्या परिवारासाठी तसेच माझ्याजवळ असणाऱ्या माझ्या गाई, बैल आणि इतर पशुधन वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरलो आहे.
 
अशा वेळी सरकारने सहानभुतीपूर्वक विचार करणे आवश्यक आहे"", असे सांगत अण्णा हजारे यांनी शेतकरी संपाला पाठिंबा दर्शनला आहे.  मात्र अण्णांचा पाठिंबा नको असल्याचे शेतकरी नेते जयाजीराव सूर्यवंशी यांनी सांगितले आहे.