शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

प्रीती राठी हत्या प्रकरणी अंकुर पनवारला फाशी

By admin | Updated: September 8, 2016 15:44 IST

प्रीती राठी अ‍ॅसिड हल्ल्यातील आरोपी अंकुर पनवार याला फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ८ -  प्रीती राठी अ‍ॅसिड हल्ल्यातील आरोपी अंकुर पनवार याला फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. मुंबई सत्र न्यायालयाने गुरूवारी हा निर्णय सुनावला.  2013 मध्ये वांद्रे स्थानकावर प्रीती राठीवर अंकुर पनवारने अॅसिड हल्ला केला होता. ज्यानंतर उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला होता.
दिल्लीहून नौदलाच्या हॉस्पिटलमधील नोकरीवर रुजू होण्यासाठी मुंबईत आलेल्या प्रीती हिच्यार २ मे २०१३ रोजी वांद्रे स्थानकात अंकुरने अॅसिड हल्ला केला होता. या हल्ल्यात प्रीतीच्या एका डोळ्याला दुखापत झाली होती, तर अॅसिडचे काही थेंब तोंडातही गेल्याने अन्ननलिकेला मोठ्या प्रमाणावर इजा पोहोचली होती. ‌तिच्यावर भायखळ्याच्या मसीना हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. मात्र, पुढील उपचारांसाठी आवश्यक असलेल्या कार्डिओ थोरॅसिक सर्जरीची सुविधा या हॉस्पिटलमध्ये नसल्याने तिला १८ मे रोजी बॉम्बे हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आलं होतं. त्यानंतर ती व्हेन्टिलेटरवरच होती. अॅसिडमुळे तिच्या शरिरातला एकेक अवयव निकामी होत गेला आणि अखेर तिची मृत्यूशी झुंज संपली. कुलाबा येथील मेडिकल कॉलेजमधील लेफ्टनंट पदासाठी देशभरातून १५ मुलींची निवड झाली होती; त्यात प्रीतीचाही समावेश होता.
प्रीती राठीचा काहीही दोष नसताना एक महिना प्राणांतिक वेदना सहन कराव्या लागल्या. तिची दृष्टी गेली, स्वरयंत्र, फुप्फुसही निकामी झाले. एक महिना सतत तिच्या पोटातून रक्तस्त्राव होत होता. अखेरीस तिचा १ जून रोजी मृत्यू झाला. निष्पाप पीडितेला एवढ्या वेदना देणाऱ्या आरोपीला फाशीच्या शिक्षेशिवाय अन्य कोणतीही शिक्षा देऊ नये,’ असा युक्तिवाद करत विशेष सरकारी वकिल उज्वल निकम यांनी अंकुरला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केल होती. 
 

(प्रीती राठी अॅसिड हल्ला प्रकरणी आरोपी अंकुर पनवारवर हत्येचा गुन्हा सिद्ध)

(प्रीती राठीच्या हल्लेखोराल उद्या होणार शिक्षा)

(प्रीती राठी प्रकरण - अंकुर पनवार दोषी; शिक्षेचा निर्णय आज)

काय होते अॅसिड हल्ल्याचे कारण? 

 

प्रीती आणि अंकुर नवी दिल्लीच्या नरेलाच्या एकाच कॉलनीमध्ये राहत होते. अंकुरला नोकरी मिळता मिळत नव्हती तर प्रीतीला आयएनएस अश्विनी येथे लेफ्टनंट (नर्सिंग) म्हणून नोकरी मिळाली.  प्रीतीच्या करिअरचा चढता आलेख, तिचे यश पाहून पनवार कुटुंबीय अंकुरला सतत हिणवत व ओरडत असत. ‘दिल्लीला असतानाही अंकुर प्रीतीला मानसिक त्रास द्यायचा. एकदा त्याने विवाहाचा प्रस्तावही ठेवला होता. परंतु, हा प्रस्ताव फेटाळला, असे खुद्द प्रीतीनेच रुग्णालयात उपचार घेत असताना तिच्या एका मैत्रिणाला सांगितले होते. प्रीतीने त्याचा प्रस्ताव नाकारल्याने अंकुरने तिला धडा शिकवण्याचा निर्णय घेतला होता,’ असा युक्तिवाद विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी केला. प्रीतीच्या करिअरमुळे तिचा मत्सर करणाऱ्या अंकुरने प्रीती ज्या ट्रेनने मुंबईला येत होती ती ट्रेन पकडली. प्रीती २ मे २०१३ रोजी वांद्रे स्थानकावर उतरली. तिच्याबरोबर अंकुरही ट्रेनमधून उतरला. संधी मिळताच त्याने तिच्यावर अ‍ॅसिड फेकले आणि दुसरी ट्रेन पकडून तो मुंबईतून पसार झाला. अ‍ॅसिडहल्ल्यानंतर प्रीतीची प्रकृती बिघडली. एक महिना तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. तिची फुप्फुसे निकामी झाली होती. अखेरीस १ जून रोजी तिचा मृत्यू झाला.

या केसमध्ये विशेष सरकारी वकिलांनी ३७ साक्षीदारांची साक्ष नोंदवली. त्यातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराने न्यायालयात सांगितले की, राठी वांद्रे टर्मिनसला उतरली त्या वेळी डोक्यावर पांढऱ्या रंगाची कॅप आणि चेहऱ्याला स्कार्फ गुंडाळलेला २० ते २५ वर्षांचा तरुण तिच्याजवळ आला. बॉक्समधून अ‍ॅसिडची बाटली काढली आणि त्यातील अ‍ॅसिड तिच्या चेहऱ्यावर फेकून तो फरार झाला. अंकुर पनवार याला पोलिसांनी एप्रिलमध्ये अटक केली. त्याच्यावर पोलिसांनी १,३२२ पानांचे दोषारोपपत्र दाखल केले. त्यात ९८ साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली..

भारतात अ‍ॅसिडहल्ल्याच्या सर्वाधिक केसेस

भारतात अ‍ॅसिड हल्ल्याच्या सर्वाधिक केसेस नोंदवण्यात आल्या आहेत. दरवर्षी जगात अ‍ॅसिड हल्ल्याच्या १५०० केसेस नोंदवण्यात येतात. त्यातील एक हजार केसेस केवळ भारतातच नोंदवण्यात येतात. २०१३मध्ये अ‍ॅसिडहल्ल्याचा समावेश फौजदारी गुन्हेगारीमध्ये केला. सर्वोच्च न्यायालयाने २०१३मध्ये बाजारात अ‍ॅसिड सहज उपलब्ध होऊ नये, यासाठी सरकारला आदेश दिला होता. तरीही बाजारात आजही अ‍ॅसिड सहजच उपलब्ध होत आहे. त्याचेच एक उदाहरण म्हणजे प्रीती राठी अ‍ॅसिडहल्ला केस.