शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

प्रस्ताव फेटाळल्याने अंगणवाडी कर्मचा-यांचा संप सुरूच, कुपोषणाहून बुलेट ट्रेन महत्त्वाची!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2017 05:27 IST

गेल्या आठ दिवसांपासून संपावर असलेल्या राज्यातील अंगणवाडी कर्मचा-यांचा मानधनवाढीचा प्रस्ताव वित्त विभागाने सोमवारी फेटाळला आहे. तरी यासंदर्भात पुन्हा प्रस्ताव तयार करण्यासाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती, महिला व बाल विकास सचिव आणि आयुक्त यांची संयुक्त बैठक मंगळवारी दुपारी १२ वाजता मंत्रालयात पार पडणार आहे.

मुंबई : गेल्या आठ दिवसांपासून संपावर असलेल्या राज्यातील अंगणवाडी कर्मचा-यांचा मानधनवाढीचा प्रस्ताव वित्त विभागाने सोमवारी फेटाळला आहे. तरी यासंदर्भात पुन्हा प्रस्ताव तयार करण्यासाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती, महिला व बाल विकास सचिव आणि आयुक्त यांची संयुक्त बैठक मंगळवारी दुपारी १२ वाजता मंत्रालयात पार पडणार आहे. त्यामुळे अंगणवाडी कर्मचा-यांचा संप आणखी काही दिवस सुरूच ठेवण्याच्या निर्णयावर कृती समिती ठाम आहे.कृती समितीचे नेते दिलीप उटाणे यांनी सांगितले की, महिला व बाल विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी सोमवारी दुपारी ३ वाजता सह्याद्री अतिथीगृहावर तातडीची बैठक बोलावली होती. त्यात त्यांनी महिला व बाल विकास विभागाने पाठवलेला प्रस्ताव वित्त विभागाकडून फेटाळण्यात आल्याची माहिती दिली. शिवाय मंगळवारी तातडीने दुसरा प्रस्ताव तयार करण्याचे आवाहन करत संप मागे घेण्याची विनंती केली. मात्र मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत संप मागे घेणार नसल्याची भूमिका कृती समितीने घेतली आहे. त्यामुळे राज्यातील सर्व अंगणवाड्या बंद ठेवून पोषण आहार वाटपाचे काम आणखी काही दिवस बंद राहणार आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला व बाल विकास विभागाने अंगणवाडी सेविकांना १० हजार ५०० आणि मदतनीसांना ८ हजार रुपये मासिक मानधन देण्याचा प्रस्ताव तयार केला होता. त्यात सेवाज्येष्ठतेनुसार मानधनवाढ देण्याची तरतूदही करण्यात आली होती. मात्र या प्रस्तावानुसार अंगणवाडी कर्मचाºयांच्या मानधनासाठी शासनाला वर्षाला १ हजार २०० कोटी रुपयांची तरतूद करावी लागणार होती. एवढा बोजा सरकारला झेपणार नसल्याचे सांगत वित्त विभागाने हा प्रस्ताव फेटाळल्याचे समजते.उद्या आझाद मैदानात मोर्चाअंगणवाडी कर्मचाºयांच्या कृती समितीमधून बाहेर असलेल्या महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेने बुधवारी, २० सप्टेंबर रोजी आझाद मैदानात धडक मोर्चाची हाक दिली आहे.>‘कुपोषणमुक्ती’सारखे महत्त्वाचे काम करणाºया अंगणवाडी कर्मचाºयांनीसंप करू नये, असे आवाहन शासनाने केले आहे. मात्र, केवळ ७ हजार लोकांच्या प्रवासाची व्यवस्था करणाºया बुलेट ट्रेनसाठी ५ हजार कोटी रुपयांची तरतूद शासनाने केली आहे. याउलट कुपोषणाविरोधात काम करणाºया २ लाख ७ हजार कर्मचाºयांची मानधनवाढ आणि पोषण आहाराचा दर्जा सुधारण्यास शासनाकडे १ हजार कोटी रुपये नाहीत. त्यामुळे शासनाला बुलेट ट्रेन ही कुपोषणमुक्तीहून अधिक महत्त्वाची वाटते का,असा सवाल कृती समितीच्या नेत्या शुभा शमीम यांनी उपस्थित केला आहे.संपात फूट पाडण्यासाठी खोटी पत्रे : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या लेटरहेडचा गैरवापर केल्याचा आरोप कृती समितीच्या नेत्या कमल परूळेकर यांनी केला आहे. संपात फूट पाडण्यासाठी संप मागे घेतल्याबाबत जिल्हा परिषदेकडून आभार मानणारे खोटे पत्र सोशल मीडियावर व्हायरल केले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.