शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाडी कर्मचा-यांचा संप सुरूच, मानधनवाढीस प्रशासनाचा नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2017 06:04 IST

‘गतवर्षीप्रमाणे मानधनवाढ हवी असेल, तर संप मागे घ्या. संप मागे घेतल्याशिवाय कोणत्याही वाटाघाटी होणार नाहीत,’ असा पवित्रा घेत, महिला व बालविकास विभागाने अंगणवाडी कर्मचारी कृती समितीसोबत सुरू असलेल्या चर्चेला मंगळवारी ब्रेक लावला आहे.

मुंबई : ‘गतवर्षीप्रमाणे मानधनवाढ हवी असेल, तर संप मागे घ्या. संप मागे घेतल्याशिवाय कोणत्याही वाटाघाटी होणार नाहीत,’ असा पवित्रा घेत, महिला व बालविकास विभागाने अंगणवाडी कर्मचारी कृती समितीसोबत सुरू असलेल्या चर्चेला मंगळवारी ब्रेक लावला आहे. मात्र, चर्चेसाठी बोलावून अशा प्रकारे नेत्यांचा पाणउतारा करणाºया प्रशासनाचा निषेध व्यक्त करत, अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने संप अधिक तीव्रतेने पुढे नेण्याचा इशारा दिला आहे.महिला व बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी सोमवारी अंगणवाडी कर्मचारी कृती समितीची तातडीची बैठक बोलावली होती. त्यात वित्त विभागाने अंगणवाडी कर्मचा-यांच्या वेतनवाढीचा प्रस्ताव फेटाळल्याचे मुंडे यांनी सांगितले, शिवाय नवा प्रस्ताव तयार करण्यासाठी मंगळवारी सचिवांच्या नेतृत्त्वाखाली बैठकीचे आयोजन केले. मात्र, मंगळवारी दुपारी बैठकीसाठी गेलेल्या कृती समितीच्या नेत्यांना उभे राहूनच संप मागे घेतल्याशिवाय वाटाघाटी करणार नसल्याचे, सचिव विनिता वेद सिंघल यांनी सांगितल्याचा आरोप कृती समितीचे नेते दिलीप उटाणे यांनी केला आहे, ही अत्यंत वाईट पद्धत होती. त्यामुळे एकमुखाने संप सुरूच ठेवण्याचा निर्धार कृती समितीने घेतल्याचेही उटाणे यांनी स्पष्ट केले. या संदर्भात कृती समितीचे नेते एम. ए. पाटील म्हणाले की, प्रशासनाने सेविकांना अवघे ९५० रुपये, मदतनिसांना ५०० रुपयांची मानधनवाढ देण्याचे आश्वासित केले आहे. मुळात ही वाढ तुटपुंजी आहे. त्यातही प्रशासनाने या आश्वासनावरही संप मागे घेतल्याशिवाय चर्चा करणार नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे संप सुरूचराहील.