मुंबई : चोरी व भीक मागण्यासाठी लहान मुलांचे अपहरण करून त्यांची हत्या केल्याप्रकरणी फाशीची शिक्षा झालेल्या रेणुका शिंदे व सीमा गावित यांनी दयेचा अर्ज निकाली काढण्यासाठी आठ वर्षे लागल्याचा मुद्दा पुढे करून ही शिक्षा रद्द करण्याची मागणी करणारी फौजदारी याचिका उच्च न्यायालयात दाखल केली आह़े
महत्त्वाचे म्हणजे गेली तेरा वर्षे या दोघी फाशीच्या भीतीने जीवन जगत आहेत़ या दोघींचे कारागृहातील वर्तनही चांगले आह़े तसेच ही घटना घडली त्यावेळी शिंदेचे वय 25 होते तर गावितचे वय 19 होत़े आता शिंदेचे वय 45 तर गावितचे वय 39 आह़े त्यात या दोघीही 1996 पासून कोठडीत आह़े त्यात त्यांचा दयेचा अर्ज निकाली काढण्यासाठी आठ वर्षाचा कालावधी लागला़ त्यामुळे त्यांची फाशीची शिक्षा रद्द करून या शिक्षेचे जन्मठेपेच्या शिक्षेत रूपांतर करावे, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आह़े
या याचिकेवर न्या़ व्ही़ एम़ कानडे व न्या़ प्रमोद कोदे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली़ त्यात न्यायालयाने फाशीला स्थगिती देण्यास नकार दिला़ तसेच या दोघांच्या फाशीची तयारी झाली आहे का, असा सवाल केला़ त्यावर फाशीची तयारी अद्याप झाली नसल्याचे सरकारी वकील संदीप शिंदे यांनी स्पष्ट केल़े ते ग्राह्य धरत न्यायालयाने ही सुनावणी उद्या, बुधवार्पयत तहकूब केली़
199क् ते ऑक्टोबर 1996 र्पयत अंजनाबाई, शिंदे व तिचा पती तसेच गावित यांनी चोरी व भीक मागण्यासाठी 13 मुलांचे अपहरण करून यातील 9 जणांची हत्या केली़ या घटनेने अवघा महाराष्ट्र हादरला होता़ यात शिंदेचा पती माफीचा साक्षीदार झाला व अंजनाबाईचे कारागृहात निधन झाल़े कोल्हापूर सत्र न्यायालयाने या दोघींना फाशीची शिक्षा ठोठावली़ (प्रतिनिधी)