- ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 20 - डॉ नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला शनिवारी तीन वर्ष पुर्ण झाल्यानिमित्त अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून ओंकारेश्वर पुलावर निषेध रॅलीचं आयोजन करण्यात आलं. हत्येला तीन वर्ष पुर्ण होऊनदेखील तपासाची चक्र अजूनही संथ असून आरोपी मोकाट असल्याचा निषेध करत यावेळी अंनिसतर्फ मोर्चा काढण्यात आला. अंनिसने काढलेल्या निषेध मोर्चामध्ये प्रकाश आंबेडकर, बाबा आढाव, अतुल पेठे, संध्या गोखले, मुक्ता दाभोलकर उपस्थित होते.
एकीकडे अंनिसचा मोर्चा निघाला असताना दुसरीकडे सनातन संस्थेनेदेखील मोर्चा काढत अंनिसवर सनातनची बदनामी करत असल्याचा आरोप केला. महाराणा प्रताप उद्यान ते कसबा गणपपतीपर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. मोर्चामध्ये कर्नल पुरोहित, साध्वी प्रज्ञा विरेंद्र तावडे आणि कमलेश तिवारी यांचे फलकही वापरण्यात आले. तसंच 'आम्ही सारे दाभोलकर' प्रमाणे 'आम्ही सारे सनातन'च्या घोषणाही देण्यात आल्या. अंनिस आणि पुरोगामींकडून सनातनची बदनामी केली जात असल्याच्या आरोप यावेळी अभय वर्तक यांनी केला आहे.