शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

‘अंनिस’चा आर्थिक घोटाळा

By admin | Updated: October 2, 2016 05:50 IST

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीला (अंनिस) परदेशी देणग्या मिळाल्या असून, वैद्यकीय जाणीव प्रकल्पांतर्गत संस्थेने शाळांमधून लाखो रुपयांची संपत्ती जमा केल्याचा आरोप सनातन

पुणे : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीला (अंनिस) परदेशी देणग्या मिळाल्या असून, वैद्यकीय जाणीव प्रकल्पांतर्गत संस्थेने शाळांमधून लाखो रुपयांची संपत्ती जमा केल्याचा आरोप सनातन संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केला. तसेच, संस्थेच्या अहवालात खाडाखोड असून, जमा केलेल्या रकमेचा दुरुपयोग केल्याचे, सातारा येथील धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या एका चौकशी अहवालात नमूद असल्याचे ते म्हणाले.सनातन संस्था; तसेच हिंदू जनजागरण समितीसह विविध संस्थांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या आर्थिक अहवालाची चौकशी करावी, अशी मागणी सातारा धर्मादाय आयुक्तांकडे केली होती. त्यानुसार ‘अंनिस’ने हिशेबपत्रके वेळेवर व नियमितपणे सादर केली नसल्याचे समोर आले आहे. त्याचप्रमाणे कागदपत्रांंमध्ये तफावत दिसते. संस्थेने ठेवी, कायम ठेवी, म्युच्युअल फंड, शेअर्स यात कोट्यवधींची गुंतवणूक केल्याचे स्पष्ट होते, असे वर्तक म्हणाले. सुनील चिंचोळकर, बापूमहाराज रावकर, सुनील घनवट, रामभाऊ पारिख, शंभू गवारे, अ‍ॅड. संजीव पुनाळेकर उपस्थित होते.वर्तक म्हणाले, ‘‘अंनिसविरोधातील तक्रारीमध्ये तथ्य असल्याचे दिसते. ‘अंनिस’ला परदेशामधून देणग्या मिळाल्या असल्याचे केंद्रीय गृह खात्याला जबाबात सांगितले आहे; तसेच मुंबई सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियमचे कलम ३५ चे उल्लंघन केल्याचे सकृतदर्शनी दिसते. स्वयंअध्ययन परीक्षाद्वारे लाखो रुपयांची संपत्ती जमा झाल्याचे खतावणीवरून आढळते, असे अहवालात म्हटले आहे.’’अंनिस संस्थेची सद्य:स्थिती लक्षात घेता, न्यासाचा कारभार पाहण्यासाठी विधी तज्ज्ञांची नेमणूक (प्रशासक म्हणून) तात्पूर्ती होणे आवश्यक आहे. संस्थेने दाखल केलेले आॅडिट रिपोर्ट व तक्रारदाराच्या तक्रारीचे स्वरूप पाहता विशेष लेखा परीक्षण होणे आवश्यक आहे, अशी शिफारस चौकशी अहवालात केली आहे. ‘अंनिस’च्या आर्थिक व्यवहाराची सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणी अभय वर्तक यांनी केली.नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या तपासाकडून जाणीवपूर्वक दुसरीकडे लक्ष वळविण्याचा प्रयत्न केला जात आहे. ‘अंनिस’ने सर्व आॅडिट रिपोर्ट सादर केलेले आहेत. त्याचबरोबर सर्व बदल अर्ज धर्मादाय आयुक्तांकडे न्यायप्रविष्ट आहेत. धर्मादाय आयुक्तांचे आदेश होण्यापूर्वीच अधीक्षकांच्या अहवालावरती ही दिशाभूल केली जात आहे. - डॉ. हमीद दाभोलकर, सरचिटणीस, अंनिस