टोकावडे : दरवर्षी २० मे हा महाराष्ट्र राज्य पशुसंवर्धन खाते स्थापना दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्यानुसार, पशुसंवर्धन विभाग, पंचायत समिती, मुरबाड यांच्या वतीने पशुधन विकास अधिकारी डॉ. सुरेश भालेराव यांच्या अध्यक्षतेखाली तो साजरा करण्यात आला. या वेळी सहायक विस्तार अधिकारी डॉ. दिलीप धानके यांनी प्रास्ताविक करताना सांगितले की, मानवी जीवनाच्या दैनंदिन व्यवहारात रोज जे दूध, अंडी, चिकन, मटण, उपलब्ध होते, त्याचा निर्माता जरी शेतकरी असला तरी पशुवैद्यकांचे आणि राज्य शासकीय पशुसंवर्धन विभागाचेही महत्त्वपूर्ण योगदान आहे. या खात्याचे अधिकारी, कर्मचारी पशुपालक शेतकऱ्यांच्या दारापर्यंत पशुवैद्यकीय सेवा देतात. तसेच शासकीय योजनांचा प्रचार-प्रसारही या खात्याच्या वतीने केला जातो. या पशुसंवर्धन दिनाचे औचित्य साधून मुरबाड तालुक्याच्या पशुवैद्यकीय संस्थेमधील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना एक गुलाबपुष्प देऊन त्यांच्या शासकीय सेवेचा सन्मान करण्यात आला. या समारंभास डॉ. शेखर देशमुख, डॉ. महेंद्र सूर्यराव, डॉ. रमेश ठाकरे, डॉ. सुनील भंडलकर, डॉ. चंद्रशेखर कासार, डॉ. मालती साळवे, डॉ. काशिनाथ पवार, डॉ. किशोरी पवार, डॉ. अर्जुन मोहपे इत्यादी अधिकारी उपस्थित होते.
पशुसंवर्धन दिन साजरा
By admin | Updated: May 21, 2016 03:37 IST