शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादी काँग्रेसमधील नाराज गट राजी

By admin | Updated: November 3, 2016 05:30 IST

श्रीवर्धन नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्षपद सर्वसाधारण खुल्या गटासाठी आहे

अलिबाग : श्रीवर्धन नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्षपद सर्वसाधारण खुल्या गटासाठी आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आघाडीकडून नगराध्यक्षपदासाठी प्रमुख इच्छुक दावेदार असताना नगराध्यक्षपदाचा व नगरसेवकपदाचे उमेदवार निवडण्याचा सर्व अधिकार श्रीवर्धन तालुका, शहर कार्यकारिणी व कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार सुनील तटकरे यांना दिले होते. नगराध्यक्षपदासाठी उमेदवार म्हणून माजी नगराध्यक्ष नरेंद्र भुसाणे यांना पुन्हा संधी देत त्यांचा या पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करून घेतल्यानंतर प्रमुख अन्य इच्छुक दावेदारांमध्ये कमालीची नाराजी पसरली होती. मात्र, आमदार सुनील तटकरे यांनी नाराज दावेदारांशी चर्चा केल्यावर सर्व नाराजांनी श्रीवर्धन नगरपालिका निवडणुकीत एकदिलाने काम करण्याची ग्वाही तटकरे यांना दिल्याने येथील कार्यकर्ते कामास लागले आहेत.श्रीवर्धन नगराध्यक्षपदासाठी उमेदवार म्हणून माजी नगराध्यक्ष नरेंद्र भुसाणे यांना पुन्हा संधी देत, त्यांचा या पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करून घेतल्यानंतर रा.काँ. तालुकाध्यक्ष दर्शन विचारे, शहरअध्यक्ष जितेंद्र सातनाक, जिल्हा उपाध्यक्ष डॉ.अबू राऊत, नरेंद्र भुसाणे या नाराज इच्छुकांबाबत निवडणुकीत पक्षाचे काम न करण्यासह पक्ष सोडण्याच्या बातम्या झळकल्या लागल्या होत्या. यामुळे श्रीवर्धन तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय बनला होता. आमदार सुनील तटकरे यांनी या प्रमुख इच्छुक नाराज मंडळींची श्रीवर्धन येथे जाऊन भेट घेतली व नाराज मंडळींनी पक्षात सक्रि य राहून एकदिलाने काम करून श्रीवर्धन नगरपालिकेत पुन्हा नगराध्यक्षासह आघाडीची निर्विवाद सत्ता आणण्याचे वचन दिले आहे.राष्ट्रवादी काँग्रेसकडे तोलामोलाचे अनेक कार्यकर्ते उमेदवारीस पात्र आहेत, पण सर्व बाबींचा सारसार विचार करून नगराध्यक्षपदासाठी पक्षाच्या वतीने नरेंद्र भुसाणे यांना उमेदवारी दिली आहे. यामुळे रात्रंदिवस मेहनत घेणाऱ्या अनेकांना नाराज व्हावे लागले याचे दु:ख निश्चितच आहे. पण दर्शन विचारे, जितेंद्र सातनाक, डॉ.अबू राऊत यांनी नाराजी दूर करून एकदिलाने काम करण्याचा निश्चय केल्याने यांच्या त्यागाची दखल सुनील तटकरे म्हणून नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष म्हणून प्रदेशपातळीवर घेईन, असे आ.तटकरे यांनी यावेळी बोलताना दिले आहे. (विशेष प्रतिनिधी)