शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीच्या कामाला जुंपल्याने अंगणवाडी कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 06:55 IST

ठिकठिकाणच्या सहायक निवडणूक निर्णय अधिकाºयांनी मतदानाच्या दिवशी या सेविकांना सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत.

आविष्कार देसाई ।लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अंगणवाडी सेविकांना लोकसभा निवडणुकीच्या कामासाठी उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. मात्र त्यांना निवडणुकीसंबंधित कामे देऊ नयेत याबाबतचे पत्रच महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी महासंघाने राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी आणि महिला व बालकल्याण विभागाचे प्रधान सचिव यांना दिले आहे. सरकार धोरणाच्या विरोधात जाऊन अंगणवाडी सेविकांची ड्युटी लावल्यास उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावणार असल्याचा इशारा महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी महासंघाचे सरचिटणीस बृजपाल सिंह यांनी ‘दिला.

ठिकठिकाणच्या सहायक निवडणूक निर्णय अधिकाºयांनी मतदानाच्या दिवशी या सेविकांना सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. मतदानाच्या दिवशी संबंधित अंगणवाडी सेविकांनी मतदानाला बालकांसहित येणाºया महिला मतदारांना योग्य त्या सुविधा देण्याचे आदेशात नमूद केले आहे. त्याचप्रमाणे आदेशाची अंमलबजावणी न केल्यास कारवाईचा बडगा उगारण्याचा इशाराही दिला आहे. सरकारनेच काढलेल्या आदेशाच्या विरोधात जाऊन अंगणवाडी कर्मचाºयांना निवडणुकीच्या कामाला जुंपले जाणार आहे. या विरोधात राज्याच्या विविध भागातून अंगणवाडी कर्मचाºयांचे सातत्याने फोन येत आहेत. त्यामुळे कर्मचाºयांमध्ये संतापाची भावना असल्याचे बृजपाल सिंह म्हणाले.अंगणवाडी सेविकांना जिल्हास्तरावर कोणतेच आदेश काढलेले नाहीत. तालुकास्तरावर आदेश दिले आहेत का याची माहिती नाही; परंतु निवडणुकीच्या कामासाठी कर्मचाºयांना आदेश काढताना प्रधान सचिवांनी दिलेल्या आदेशाबाबत काळजी घेण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या आहेत. -पद्मश्री बैनाडे, निवासी उपजिल्हाधिकारी, रायगड