शहरं
Join us  
Trending Stories
1
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
2
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
3
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
4
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
5
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
6
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
7
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
8
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
9
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
10
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा
11
"हार्डवेअर चांगलं होतं पण सॉफ्टवेअर खराब...", शेफाली जरीवालाच्या मृत्यूबाबत रामदेव बाबांचं वक्तव्य
12
धक्कादायक! प्रेमी युगुलाने ऑटोत घेतला गळफास; तरुणीचे लग्न ठरल्याने उचलले टोकाचे पाऊल
13
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर...
14
मंडीमध्ये ढगफुटीमुळे प्रचंड नुकसान; घरं, रस्ते, पूल गेले वाहून, ४ जणांचा मृत्यू, १६ बेपत्ता
15
Viral Video: इंदूरचा सुवर्ण महाल!! वॉश बेसिन ते इलेक्ट्रिक स्विच... सारं काही २४ कॅरेट सोन्यानं मढवलेलं...
16
बाजारात शांतता! गुंतवणूकदारांची 'वेट अँड वॉच'ची भूमिका; रिलायन्स-एचडीएफसीसह 'हे' शेअर्स वधारले
17
भारतापासून १४ हजार किलोमीटर दूर 'या' देशात राहतात असंख्य भारतीय! दरवर्षी साजरी होते दिवाळी
18
ठरलं! 'या' दिवशी जाहीर होणार सीए २०२५ परीक्षेचा अंतिम निकाल; कधी आणि कुठे पाहायचा?
19
"शेतकऱ्यांसाठी खासदारकीचा राजीनामा तोंडावर फेकला तर निलंबनाचे काय, शेतकऱ्यांसाठी...’’, निलंबनानंतर नाना पटोले आक्रमक 
20
सावत्र बापच बनला हैवान! आईला जीवे मारण्याची धमकी देऊन मुलीवर करत होता बलात्कार; मुलगी गर्भवती होताच...

इच्छुकांची भाऊगर्दी अन् मित्रपक्षांची नाराजी

By admin | Updated: January 14, 2015 04:24 IST

राज्यातील सत्तेत प्रमुख भागीदार असलेल्या भाजपामध्ये विधान परिषदेवर जाण्याकरिता किमान दोन डझन इच्छुक आहेत. त्याचवेळी रिपाइं, स्वाभिमानी शेतकरी संघटना व राष्ट्रीय समाज

संदीप प्रधान, मुंबईराज्यातील सत्तेत प्रमुख भागीदार असलेल्या भाजपामध्ये विधान परिषदेवर जाण्याकरिता किमान दोन डझन इच्छुक आहेत. त्याचवेळी रिपाइं, स्वाभिमानी शेतकरी संघटना व राष्ट्रीय समाज पक्ष हे मित्र सत्तेत वाटा न मिळाल्याने नाराज आहेत. त्यामुळे आता स्वपक्षातील इच्छुकांना खूष करायचे की मित्र पक्षांना या कात्रीत भाजपा सापडला आहे.विधान परिषदेच्या चार जागांकरिता निवडणुकीची अधिसूचना निघाली असून या निवडणुका स्वतंत्र घेतल्या जाणार असल्याने सर्वच्या सर्व जागा सत्ताधारी भाजपा-शिवसेनेच्या पारड्यात जाणार आहेत. या निवडणुकीकरिता अर्ज दाखल करण्याची अखेरची मुदत २० जानेवारी असून ३० जानेवारीस मतदान होणार आहे. शिवसेनेने विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या सुभाष देसाई यांना मंत्री केले असल्याने त्यांना एक जागा सोडावी लागेल. याखेरीज उरलेल्या तीन जागांकरिता भाजपात दोन डझन इच्छुक आहेत. त्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय सुजीतसिंह ठाकूर, केंद्रीय नेत्यांच्या निकटवर्तीय शायना एन.सी., मुख्य प्रवक्ते माधव भांडारी, मिलींद पाटील, गणेश हाके, केशव उपाध्ये, नीता केळकर, विनय नातू, बाळ माने आदींचा समावेश आहे. भाजपामधील इच्छुकांपैकी तीन जणांची वर्णी लागली तर नाराज होणाऱ्यांची संख्या मोठी असेल. त्याचवेळी रिपाइं, स्वाभिमानी शेतकरी संघटना व राष्ट्रीय समाज पार्टी हे निवडणुकीतील मित्रपक्ष सत्तेत वाटा न मिळाल्याने नाराज आहेत. स्वाभिमानीचे सदाभाऊ खोत व रासपाचे महादेव जानकर हे विधान परिषदेवर जाण्यास उत्सुक आहेत.ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांकरिता स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुण्यात हिंसक आंदोलन हाती घेतले. धनगर आरक्षणाचा मुद्दा ‘रासपा’ने पेटवला आहे. अशा वातावरणात खोत व जानकर यांचा विधान परिषदेवर समावेश केला नाही तर येत्या काही दिवसांत विरोधी पक्षांची स्पेस हे मित्रपक्ष काबीज करतील आणि सरकारला डोकेदुखी निर्माण करतील, अशी भीती भाजपाला वाटते. रिपाइं आज शांत असली तरी दलित अत्याचाराच्या एखाद्या प्रकरणात तेही महाराष्ट्रात आपली शक्ती दाखवू शकतील. त्यामुळे मित्रपक्षांना सत्तेत सामावून घेणे ही भाजपाची गरज आहे. मात्र भाजपामधील इच्छुक मित्रपक्षांना वाटाण्याच्या अक्षता लावल्या जाव्या याकरिता प्रयत्नशील आहेत.