शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

१० मार्चला राज्यातील अंगणवाड्या बंद !

By admin | Updated: March 4, 2017 05:34 IST

महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने १० मार्चला विधानसभा अधिवेशनावर धडक मोर्चा काढण्याची घोषणा केली

मुंबई : राज्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांना शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा द्या, या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने १० मार्चला विधानसभा अधिवेशनावर धडक मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. या राज्यव्यापी मोर्चात कर्मचाऱ्यांच्या सर्वच संघटना उतरल्याने १० मार्चला राज्यातील सर्वच अंगणवाड्या बंद राहण्याची शक्यता आहे.यासंदर्भातील निवेदन कृती समितीने महिला व बालविकास विभागाचे मंत्री, प्रधान सचिव आणि आयुक्तांना दिले आहे. अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविका या शासकीय योजनांच्या माध्यमातून लोकांना पोषण, आरोग्य शिक्षण, स्वच्छता यासंबंधीच्या सेवा देण्याचे महत्त्वाचे काम अत्यल्प मानधनावर करत असल्याची माहिती कृती समितीच्या निमंत्रक शुभा शमीम यांनी दिली. शमीम म्हणाल्या की, लोकांना सेवा देण्याचे सरकारचे काम अंगणवाडी कर्मचारी करत असून त्यांना मानधनी कर्मचारी म्हणून नेमले जात आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना शासकीय अधिकारांपासूनही वंचित राहावे लागत आहे. परिणामी, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा आणि वेतनश्रेणी देण्याची प्रमुख मागणी कृती समितीने केली आहे.दरम्यान, अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात सन्मानजनक वाढ करण्याचे आवाहन कृती समितीने केले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे लोकसंख्या कमी असलेल्या ठिकाणी अंगणवाडीऐवजी मंजूर झालेल्या मिनी अंगणवाड्यांमध्ये एकच मिनी अंगणवाडी सेविका असते. त्यामुळे सेविका आणि मदतनीस अशी दोघांची कामे मिनी अंगणवाडी सेविकेला करावी लागतात. तुलनेने मानधन मात्र कमी मिळते. म्हणूनच मिनी अंगणवाडीला पूर्ण अंगणवाडीचा दर्जा देऊन तेथील सेविकेला नियमित सेविकेचा दर्जा देऊन सोबतीला मदतनिसाची नेमणूक करावी, असे आवाहन कृती समितीने केले आहे. (प्रतिनिधी)>अंगणवाडी सेविकांच्या मागण्या मानधन, प्रवास व बैठक भत्ता अनियमितपणे मिळतो, तो दर महिन्याला मिळावा.विलंबाने मिळणारे आहाराचे अनुदान किंवा इंधन भत्ता हा दर महिन्याला मिळावा.कोणत्याही शासकीय कामासाठी लागणारे साहित्य व नेण्या-आणण्यासाठी लागणारा खर्च शासनानेच द्यावा.२००८ सालापासून सेवामुक्त झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांना तत्काळ सेवासमाप्ती लाभ द्यावा.भाऊबीज भेट म्हणून देण्यात येणारा १ हजार रुपये बोनस खूपच तोकडा असून त्याऐवजी एका मानधनाइतकी रक्कम द्यावी.आजारपणासाठी वर्षाला १५, तर उन्हाळ्यात किमान १ महिन्याची भरपगारी रजा मंजूर करावी.