शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाडी आहाराच्या पाकिटांवर खाडाखोड

By admin | Updated: January 12, 2017 04:19 IST

येथील औद्योगिक वसाहतीमधील एका कारखान्यात अंगणवाडी पोषक आहाराच्या पाकिटावरील तारखा बदलल्या जात

वसई : येथील औद्योगिक वसाहतीमधील एका कारखान्यात अंगणवाडी पोषक आहाराच्या पाकिटावरील तारखा बदलल्या जात असल्याचा प्रकार उजेडात आला आहे, तसेच मुदतबाह्य आणि विना तारखेची हजारो खाद्यपाकिटेही आढळून आली. पोलिसांनी हा माल जप्त करून पुढील तपासासाठी अन्न व प्रशासन खात्याकडे पाठविला आहे. हा प्रकार उजेडात आल्यामुळे वसईत अंगणवाड्यांना पुरवल्या जाणाऱ्या आहाराबाबत संशय निर्माण झाला आहे. कुपोषणावर मात करण्यासाठी महिला बाल विकास विभागातर्फेएकात्मिक बाल विकास सेवा योजना राज्यभर राबविली जाते. अंगणवाडीमधील ३ महिने ते सहा वर्षांच्या मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी सूक्ष्म तत्त्वपोषक आहार दिला जातो. तो बनविण्याचे ठेके कंत्राटी पद्धतीने दिले जातात. त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचे काम शासनाचे आहे, पण त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचे नियंत्रण नसल्याचे या प्रकारावरून उघड झाले आहे. ठेकेदार केवळ नफ्याचा व्यापार म्हणून या पोषक आहार निर्मितीकडे पाहतात. त्यामुळे हा आहार किती पोषक असतो? असा प्रश्न निर्माण झाला आहे.वालीव येथील महावीर इंडस्ट्रिजमधील एका कारखान्यात वसई-विरार महानगरपालिकेचे कर अधिकारी मिलिंद पाटील करवसुलीसाठी आपल्या पथकासह गेले होते. त्या वेळी कारखान्यात पोषक आहारांच्या पाकिटावरील तारीख थिनरने पुसून, दुसरी तारीख टाकण्याचे काम कामगार करीत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी लगेचच पोलिसांना पाचारण केले. त्यानंतर, या ठिकाणी सुरू असलेले बालकांच्या आरोग्याला धोका निर्माण करणारे अनेक प्रकार उजेडात आले. या पोषण आहाराच्या पुरवठादार शलाका महिला मंडळ आहेत. या कारखान्यात खाद्यपदार्थांच्या पाकिटावरील डिसेंबर महिन्यातील तारीख थिनरच्या सहाय्याने पुसून, त्यावर जानेवारी महिन्यातील तारीख टाकली जात होती. एका टेम्पोत विना तारखेची हजारो पाकिटे आढळून आली, तसेच डिसेंबरची मुदत संपलेली पाकिटे गोदामाबाहेर नेण्याचे काम सुरू होते. पोलिसांनी या टेम्पोसह थिनरच्या बाटल्या आणि तारखेचा स्टँप जप्त केला व आहाराची पाकिटे अन्न आणि औषध प्रशासनाकडे तपासणीसाठी पाठविला आहे. त्यांचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे. या प्रकरणी अद्याप कुणावरही कारवाई करण्यात आलेली नाही. दरम्यान, यात कोणताही गैरप्रकार झालेला नाही. पाकिटावर तारीख चुकीची टाकली गेल्याने ती बदलण्याचे काम केले जात होते, असे बचत गटाचे प्रतिनिधी योगेश माने यांनी सांगितले. (प्रतिनिधी)प्रशासनाचे नियंत्रण नाहीकुपोषणावर मात करण्यासाठी महिला बाल विकास विभागातर्फेएकात्मिक बाल विकास सेवा योजना राज्यभर राबविली जाते. अंगणवाडीमधील ३ महिने ते सहा वर्षांच्या मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी सूक्ष्म तत्त्वपोषक आहार दिला जातो. तो बनविण्याचे ठेके कंत्राटी पद्धतीने दिले जातात. त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचे काम शासनाचे आहे, पण त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचे नियंत्रण नसल्याचे या प्रकारावरून उघड झाले आहे.