शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकमध्ये आॅनर किलिंग : गर्भवती लेकीची हत्या; बापाला फाशी

By admin | Updated: June 20, 2017 02:00 IST

आंतरजातीय विवाह केल्याचा राग वर्षभर मनात धरून नऊ महिन्यांच्या गर्भवती लेकीची हत्या करणाऱ्या जन्मदात्यास

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : आंतरजातीय विवाह केल्याचा राग वर्षभर मनात धरून नऊ महिन्यांच्या गर्भवती लेकीची हत्या करणाऱ्या जन्मदात्यास सोमवारी जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपी एकनाथ किसन कुंभारकर (४४) यास फाशीची शिक्षा सुनावली.कुंभारकर यांनी २८ जून २०१३ रोजी रिक्षामध्ये विवाहित मुलगी प्रमिला हिची गळा आवळून हत्या केली होती. कामगारनगरमधील काशीनाथ कांबळे यांच्या कु टुंबातील दीपक कांबळे (२३) या तरुणाशी प्रमिलाचे प्रेमसंबंध जुळले होते. वणीच्या गडावर २०१२ मध्ये त्यांनी विवाह केला होता. विवाहानंतर सहा ते सात महिन्यांनंतर कुंभारकर याने मुलीच्या घरी येणे-जाणे सुरू केले. जावयासह सासरच्या लोकांचा विश्वास संपादन केला. प्रमिला नऊ महिन्यांची गर्भवती असताना प्रसुतीच्या काही दिवसांपूर्वीच त्याने पहाटे तिच्या सासरी जाऊन आजीची प्रकृती बिघडली आहे, असे खोटे सांगून प्रमिलाला सोबत घेतले. तिला रिक्षामधून निर्जन ठिकाणी फिरविले. सावरकरनगरमध्ये एका खासगी रुग्णालयासमोर रिक्षा थांबविली आणि रिक्षाचालकाला रुग्णालयातून मामाला बोलवायला सांगितले. रिक्षाचालक रुग्णालयाच्या दिशेने गेल्यानंतर कुंभारकरने प्रमिलाचा गळा आवळला. रिक्षाचालकाने हा प्रकार बघितला. प्रमिलाच्या तोंडातून फेस येत होता. मात्र कुंभारकरने घटनेनंतर पलायन केले होते. न्यायालयाने एकूण दहा साक्षीदार तपासले. जिल्हा व सत्र न्यायाधीश सुचित्रा घोडके यांनी कुंभारकर यास फाशीची शिक्षा सुनावली. प्रमिलाच्या हत्येच्या निषेधार्थ अंधश्रद्धा निर्मूलन समितीने मोर्चा काढला होता. त्यानंतर डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी ८ आॅगस्ट २०१३ रोजी नाशिकला परिषद घेतली होती. त्यानंतर आठवडाभराने लातूरमध्येही त्यांनी परिषद घेतली होती. दुर्दैवाने २० आॅगस्ट २०१३ रोजी दाभोलकरांचीच हत्या झाली. १३ एप्रिल २०१६ रोजी राज्य सरकारने सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा संमत केल्याने या लढ्याला यश आले.