शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

... आणि ‘झोये’ पुन्हा पाहू लागला !

By admin | Updated: April 16, 2017 03:26 IST

‘झोये’ या श्वानावर परळच्या पशुवैद्यकीय रुग्णालयात मोतीबिंदूची यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली. त्यानंतर, आता तिसऱ्या आठवड्यानंतर ‘झोये’च्या

- स्नेहा मोरे, मुंबई

‘झोये’ या श्वानावर परळच्या पशुवैद्यकीय रुग्णालयात मोतीबिंदूची यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली. त्यानंतर, आता तिसऱ्या आठवड्यानंतर ‘झोये’च्या डोळ््याची दृष्टी पुन्हा आली असून, त्याला दिसू लागले आहे. त्यामुळे रुग्णालयातील डॉक्टर आणि ‘झोये’च्या मित्रपरिवारांत आनंदाचे वातावरण आहे. ‘झोये’या पाचवर्षीय लॅब्राडोर जातीच्या श्वानाच्या उजव्या डोळ््यावर २५ मार्च रोजी मोतीबिंदूची शस्त्रक्रिया पार पडली. गेल्या वर्षी परळच्या पशुवैद्यकीय रुग्णालयाच्या बाहेरील आवारात ‘झोये’ जखमी अवस्थेत आढळला होता. त्या वेळेस त्याला दिसत नसल्याने, सतत भिंती आणि खांबांना आदळायचा. ‘झोये’ला आम्हाला दत्तक घ्यायचे होते, परंतु त्याच्या दृष्टीच्या समस्येने अडथळे येत होते, असे अ‍ॅनिमल अ‍ॅडॉप्शन क्रुसेडर्स संस्थेशी संलग्न असलेल्या प्राणिमित्र असलेल्या कीर्ती भारद्वाज यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. त्यानंतर, पशुवैद्यकीय रुग्णालयातील डॉक्टरांशी ‘झोये’च्या स्थितीविषयी चर्चा केली, त्या वेळेस त्यांनी शस्त्रक्रियेचा सल्ला दिला.श्वानावर झालेल्या मोतीबिंदू शस्त्रक्रियेविषयी माजी लष्कर पशुवैद्यक व बलघोडा रुग्णालयाचे सचिव कर्नल डॉ. जे. सी. खन्ना यांनी सांगितले की, ‘श्वानावर करण्यात आलेल्या मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेचे स्वरूप मानवी डोळ््यावर करण्यात येणाऱ्या शस्त्रक्रियेप्रमाणे होते. या शस्त्रक्रियेनंतर श्वानाची पूर्ण दृष्टी येणार नाही. यापूर्वीही पशुवैद्यकीय रुग्णालयात भटक्या श्वानावर मोतीबिंदूची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. या शस्त्रक्रियेच्या प्रक्रियेत नेत्रतज्ज्ञ डॉ. स्वरांजित भट्टी यांचाही सहभाग होता.’ ते म्हणाले की, ‘शस्त्रक्रियेनंतर काही दिवस ‘झोये’ला एलिझाबेथ कॉलर लावून निरीक्षणाखाली ठेवण्यात आले होते. शस्त्रक्रियेनंतर ‘झोये’ची प्रकृती सुधारत असून, अंतिमत: ४० टक्के दृष्टी निश्चितच परत येईल.’- श्वानावर झालेल्या मोतीबिंदू शस्त्रक्रियेविषयी माजी लष्कर पशुवैद्यक व बलघोडा रुग्णालयाचे सचिव कर्नल डॉ. जे. सी. खन्ना यांनी सांगितले की, ‘श्वानावर करण्यात आलेल्या मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेचे स्वरूप मानवी डोळ््यावर करण्यात येणाऱ्या शस्त्रक्रियेप्रमाणे होते. या शस्त्रक्रियेनंतर श्वानाची पूर्ण दृष्टी येणार नाही. मात्र, पूर्वीपेक्षा श्वानाचे आयुष्य निश्चितच सुरळीत होईल.