शहरं
Join us  
Trending Stories
1
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
2
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
3
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
4
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
5
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
6
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
7
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
8
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
9
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
10
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
11
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
12
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
13
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
14
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
15
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
16
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
17
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
18
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
19
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
20
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप

...तर महापालिकेच्या आवारात खड्डे खोदू, प्रहार संघटनेचा इशारा

By admin | Updated: August 13, 2016 17:02 IST

कावड यात्रेपूर्वी या मार्गांवरील खड्डे बुजवा, अन्यथा महानगर पालिकेच्या आवारात खड्डे खोदू, असा इशारा देत प्रहार संघटनेने शनिवारी कावड मार्गावर अभिनव आंदोलन केले

- ऑनलाइन लोकमत 
 
पालखी मार्गावरील खड्डे बुजवा : प्रहारचे अभिनव आंदोलन
 
अकोला, दि. 13 -  संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेला अकोला शहरातील कावड यात्रा महोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. परंतु ज्या मार्गांवरून कावड यात्रा काढली जाते, त्या मार्गांवर प्रचंड खड्डे आहेत. त्यामुळे कावड यात्रेपूर्वी या मार्गांवरील खड्डे बुजवा, अन्यथा महानगर पालिकेच्या आवारात खड्डे खोदू, असा इशारा देत प्रहार संघटनेने शनिवारी कावड मार्गावर अभिनव आंदोलन केले.
 
श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी अकोला शहरात कावड महोत्सव साजरा केला जातो. शहरातील हजारो शिवभक्त नजीकच्या गांधीग्राम येथील पुर्णा नदीचे पाणी कावडद्वारे आणून राजराजेश्वराला जलाभिषेक करतात. गांधीग्राम येथून शिवभक्तांची कावड यात्रा ज्या मार्गाने शहरात प्रवेश करते त्या मार्गावर प्रचंड खड्डे पडलेले आहेत. खांद्यावर कावडचा भार व रस्त्यावर खड्डे अशा स्थितीत पायी प्रवास करणा-या शिवभक्तांना इजा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 
 
टिळक मार्गासह शहरातील सर्वच रस्ते खड्डेमय झालेले असताना, स्थानिक प्रशासनाचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे. कावड महोत्सवापूर्वी कावड मार्गावरील खड्डे तातडीने बुजविण्यात यावे. तसे न झाल्यास प्रहार संघटना महापालिकेच्या आवारात खड्डे खोदेल, असा इशारा संघटनेने मनपा आयुक्तांना एका निवेदनाद्वारे दिला आहे. दरम्यान, शनिवारी प्रहारच्या कार्यकर्त्यांनी टिळक मार्गावरील खड्ड्यांना मार्किंग करून अभिनव आंदोलन केले. यावेळी शहर अध्यक्ष मनोज पाटील, सोपान कडाळे, परेश पाटील, योगेश ढोरे, रोहित गावंडे, सिद्धार्थ सदांशिव, मंगेश गणेशकर, ऋषी गावंडे, प्रभाकर वानखडे, हरिष बोंडे, प्रशांत झाडे, धिरज बुलबुले, सुरज धायडे, शुभम वाकोडे, चेतन तोडकर, गोपाल गावंडे, शुभम ठाकूर, धिरज पुंडकर, तुषार उज्जैनकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.