शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

...अन् ट्रान्सफॉर्मर हलवला दुसरीकडे

By admin | Updated: March 3, 2017 01:24 IST

जिल्हा परिषद शाळेजवळील ट्रान्सफॉर्मरचे खांब शाळेवर झुकून विद्युतवाहक तारा शाळेच्या पत्र्यांवर लोंबकळत होत्या

तळेघर : आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील चिखली येथील जिल्हा परिषद शाळेजवळील ट्रान्सफॉर्मरचे खांब शाळेवर झुकून विद्युतवाहक तारा शाळेच्या पत्र्यांवर लोंबकळत होत्या. याबाबत ‘लोकमत’ने वारंवार आवाज उठवत वेळोवेळी याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले. प्रशासनाने याची तत्काळ दखल घेत हा ट्रान्सफॉर्मर दुसरीकडे हलविण्यात आला.चिखली गावांमध्ये असणाऱ्या जिल्हा परिषद शाळेशेजारील ट्रान्सफॉर्मरच्या तारा शाळेच्या भिंतीवर व पत्र्यांवर टेकल्यामुळे विजेचा प्रवाह चालू असताना या भिंती व पत्र्यांमध्ये विजेचा शॉक उतरत होता, तर याच ट्रान्सफॉर्मरचे खांब शाळेवरती झुकलेले होते. यामुळे या शाळेतील लहान मुलांना, परिसरातील ग्रामस्थांना हा ट्रान्सफॉर्मरचा धोका केव्हाही संभवला जाऊ शकला असता. नेहमीच वर्दळीच्या असणाऱ्या रस्त्याच्या कडेलाच हा ट्रान्सफॉर्मर असल्यामुळे येणाऱ्या-जाणाऱ्या ग्रामस्थांनाही जीव मुठीत घेऊन ये-जा करावी लागत असे. त्याचप्रमाणे जिल्हा परिषद शाळेच्या परिसरामध्ये असल्यामुळे लहान मुलांचा नेहमीचाच या ठिकाणी वावर होता. (वार्ताहर) पावसाळ्यामध्ये या शाळेला पूर्णपणे शॉक येत असल्याची माहिती शिक्षक व ग्रामस्थांनी महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना देऊनही हे अधिकारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत होते. याचीच दखल घेत लोकमतने याचा पाठपुरावा करत याबाबतची वृत्ते वारंवार प्रसिद्ध केली. यामुळे महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना जाग येत हा ट्रान्सफॉर्मर तत्काळ दुसऱ्या सुरक्षिततेच्या ठिकाणी हलविण्यात आला आहे. चिखली येथील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक व ग्रामस्थ शिवसेनेचे आदिवासी नेते विजयराव आढारी, अनिताताई आढारी, सरपंच चिंतामण आढारी, साहेबराव भालेराव, संतोष भालेराव, सीताराम उंडे यांनी ‘लोकमत’चे कौतुक करत आभार मानले.