शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

...आणि ती आईच्या कुशीत विसावली  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 02:14 IST

आपल्या कुटुंबीयांसमवेत अष्टविनायक यात्रेला निघालेल्या सोलापूर येथील भाविकाची अडीच वर्षे वयाची मुलगी थेऊर येथे विसरून राहिली. ३० किलोमीटर दूर गेल्यानंतर त्यांच्या गाडीत मुलगी नसल्याचे लक्षात आले. सुरक्षारक्षक विश्वस्त व व्यवस्थापक यांच्या सतर्कतेमुळे पुन्हा आई-वडिलांकडे ती सुखरूप पोहोचली. ही घटना ९ आॅगस्ट रोजी थेऊर येथे घडली.

लोणी काळभोर : आपल्या कुटुंबीयांसमवेत अष्टविनायक यात्रेला निघालेल्या सोलापूर येथील भाविकाची अडीच वर्षे वयाची मुलगी थेऊर येथे विसरून राहिली. ३० किलोमीटर दूर गेल्यानंतर त्यांच्या गाडीत मुलगी नसल्याचे लक्षात आले. सुरक्षारक्षक विश्वस्त व व्यवस्थापक यांच्या सतर्कतेमुळे पुन्हा आई-वडिलांकडे ती सुखरूप पोहोचली. ही घटना ९ आॅगस्ट रोजी थेऊर येथे घडली.सोलापूर जिल्ह्यातील खंडाळी गावाचे अमोल हरिदास लावंड हे आपली आई, पत्नी, दोन बहिणी, आत्या, एक भाऊ व सहा लहान मुले यांच्यासमवेत जीपने अष्टविनायक यात्रेसाठी निघाले होते. ते सर्वजण मोरगाव, सिद्धटेकचे दर्शन घेऊन दुपारी थेऊर येथे श्री चिंतामणीच्या दर्शनासाठी आले. दर्शन घेतल्यानंतर ते सर्व जण काही वेळ तेथे थांबले. त्यानंतर २.३० वाजण्याच्या सुमारास ते रांजणगाव येथे दर्शनासाठी निघाले. त्यांची गाडी थेऊरपासून सुमारे ३० किलोमीटर गेली, त्या वेळी अमोल लावंड यांच्या बहिणीने मुलांना खाऊ म्हणून खोबºयाची बर्फी देण्यास सुरुवात केली. त्या वेळी अमोल यांची श्रेया ही मुलगी गाडीत नसल्याचे लक्षात आले. त्यामुळे सर्व जण चिंतेत पडले.दरम्यानच्या काळात थेऊर येथील श्री चिंतामणीच्या मंदिरातील सुरक्षारक्षक मनीषा हरिहर व विजय कांबळे यांना मुख्य मंडपातील दानपेटीपाशी एक अडीच वर्षांची मुलगी रडत बसलेली दिसली. या दोघांनी तिची चौकशी केली. परंतु, घाबरल्यामुळे ती काहीच बोलत नव्हती. या मुलीला घेऊन ते दोघे सुमारे २० मिनिटे तेथेच थांबले. परंतु, तिला नेण्यास कोणीही न आल्याने त्यांनी या मुलीला चिंचवड देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त हभप आनंदमहाराज तांबे व व्यवस्थापक डॉ. मंगलमूर्ती पोफळे यांच्याकडे नेले. ही मुलगी कोणासमवेत आली, याचा शोध घेण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज पाहण्यात आले. त्यामध्ये ही मुलगी एकटीच इकडेतिकडे फिरताना दिसत होती.गाडीत आपली श्रेया न दिसल्याने अमोल लावंड यांनी गाडी परत थेऊरकडे वळवली. परंतु, नगर-पुणे महामार्गावर वहातूक जास्त असल्याने त्यांना लवकर मार्गक्रमणा करता येत नव्हते. सायंकाळी ५.३०च्या सुमारास हे सर्व चिंतामणीच्या मंदिरात पोहोचले व मुलीचा शोध घेण्यास सुरुवात केली. चौकशी करीत ते मंदीर कार्यालयात आले त्या वेळी त्यांची श्रेया त्यांना खुर्चीवर बसलेली दिसली. आई-वडिलांना पाहताच धावत जाऊन ती त्यांचे कुशीत विसावली.अमोल लावंड यांनी आपली श्रेया सुखरूप मिळाल्याबद्दल व तिचा सांभाळ केल्याबद्दल विश्वस्त, व्यवस्थापक व सुरक्षारक्षक यांचे हात जोडून आभार मानले व श्रेया हिला घेऊन ते रांजणगाव गणपतीकडे रवाना झाले.