शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

... आणि शाओलिनचा घात झाला

By admin | Updated: August 31, 2015 01:03 IST

शाओलिन चंदम हा जर त्याच्या घरमालकाला तो राहात होता त्या अपार्टमेंटच्या किल्ल्या द्यायला गेला नसता तर आज तो जिवंत असता. परंतु तसे झाले नाही व चंदमच्या खोलीत राहणारा

मुंबई : शाओलिन चंदम हा जर त्याच्या घरमालकाला तो राहात होता त्या अपार्टमेंटच्या किल्ल्या द्यायला गेला नसता तर आज तो जिवंत असता. परंतु तसे झाले नाही व चंदमच्या खोलीत राहणारा त्याचा बेरोजगार सोबती त्याला ठार मारून त्याचे पैसे घेऊन पळाला. मणिपूरच्या सेवानिवृत्त कर्नलचा शाओलिन हा टेनिसचे अजिंक्यपद पटकावलेला मुलगा. शाओलिनचा २५ आॅगस्ट रोजी अमेरिकेत साऊथ व्हर्जिनियातील हॅम्पटन येथे खून झाला. त्याचा मृतदेह भारतात आणण्यासाठी त्याचा कॅनडातील चुलत भाऊ कामाला लागला आहे. शाओलिनला बढती मिळाल्यामुळे तो १ सप्टेंबर रोजी ईस्ट कोस्ट येथे राहायला जाणार होता. त्यामुळे त्याने घरमालकाला घर रिकामे करायच्या आधी एक महिन्याची नोटीसही दिली होती. त्याच्या अपार्टमेंटमध्ये ३-४ खोल्या होत्या व त्यातील एक मारेकरी किननकडे होती. शाओलिन घरमालकाकडे किल्ल्या देण्यासाठी गेल्यावर किननने त्याला लुबाडायचे ठरविले, असे शाओलिनचे वडील रंजन चंदम यांनी सांगितले. रंजन चंदम हे आसाम रायफल्समध्ये कार्यरत होते. किननने शाओलिनला लुबाडायचे २५ आॅगस्ट रोजी ठरविले. त्याने त्याला विरोध करताच किननने त्याला गोळ््या घातल्या त्याचे पैशांचे पाकीट व मौल्यवान वस्तू असलेली बॅग घेऊन तो गेला. तो पळत होता परंतु त्याने त्याच्या एका मित्राकडे ही बॅग ठेवली. हा मित्र मग पोलिसांकडे गेला. किननला पोलिसांनी सुफोक येथे अटक केल्यावर त्याचा खुलासा झाला. खून झाला ते ठिकाण हॅम्पटन येथील लॅसले अ‍ॅव्हेन्यू.शाओलिनच्या मृतदेहासंदर्भातील पोलिसांकडील काम पूर्ण झाले परंतु डिस्ट्रीक्ट अ‍ॅटर्नी रविवार असल्यामुळे रजेवर होते. माझा पुतण्या सर्व प्रकारच्या परवानग्या सोमवारी घेईल. आधी मृतदेह वॉशिंग्टन डीसी येथे न्यावा लागेल व तेथून तो दिल्लीला आणला जाईल, असे ते म्हणाले.शाओलिन हा टेनिसचा अजिंक्यपद विजेता होता. चेन्नईच्या ब्रिटानिया अमृतराज टेनिस अकादमीने त्याची निवड केली होती. गुडगावमधील राष्ट्रीय टेनिस अकादमी व चंदीगढ येथील लॉन टेनिस असोसिएशनमध्ये त्याचे प्रशिक्षण पूर्ण झाले होते. साऊथ व्हर्जिनिया युनिव्हर्सिटीत तो बिझनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन व लीडरशिप प्रोग्रॅॅम शिकत होता. सध्या तो शेल्टन ल्युकास इन्शुरन्स अँड फायनान्स सर्व्हिसेसमध्ये जरी काम करीत होता तरी त्याची युनिव्हर्सिटीने कॅप्टन म्हणून निवड केली होती.