शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

...आणि म्हणे हिंदू धर्म परमसहिष्णू आहे!

By admin | Updated: September 11, 2015 03:37 IST

श्रावण मास अजून संपलेला नाही. या संपूर्ण महिन्यात म्हणे हिंदू धर्मातील परम भावभोळे सामीष भोजनाला स्पर्श करीत नाहीत. महिनाभराचा उपवास होणार या भावनेनेच कापरे

-  हेमंत कुलकर्र्णी श्रावण मास अजून संपलेला नाही. या संपूर्ण महिन्यात म्हणे हिंदू धर्मातील परम भावभोळे सामीष भोजनाला स्पर्श करीत नाहीत. महिनाभराचा उपवास होणार या भावनेनेच कापरे भरणाऱ्या त्यांच्या जिव्हांनी त्यांना दिव्याच्या अमावस्येलाच गटारीची आवस बनवून टाकण्यासाठी उद्युक्त केलेले.मुळात केवळ श्रावणातच नव्हे, तर चतुर्मासात वातुळ म्हणजे पचायला जड पदार्थांचे सेवन बव्हंशी धर्मांनी (अगदी हिंदू धर्मासकट) त्याज्य ठरविले कारण तेव्हा पावसाळा असतो आणि या काळात पोटातील अग्नी मंद होत असतो. म्हणजे सामीष पदार्थांच्या सेवनाचा संबंध थेट आरोग्य रक्षणाशी आहे. पूर्वी ते सांगून पटले नसते म्हणून त्याला धर्माची जोड, इतकेच. तरीही जे महिनाभर दम धरू शकतात, त्यांचा जीव चार-आठ दिवस दम धरायला इतका कासावीस व्हावा?तरीही श्रावण वगळता एरवी रोजच मांसाहार करणारे, तो खिशाला आणि पोटालाही परवडू शकणारे असे कितीसे लोक आहेत? मटण फार महाग झाले हो, परवडत नाही,अशी तक्रार कोणाची असते? आठवड्यातले रविवार आणिबुधवार वगळता, अन्य दिवशी मांसाहार वर्ज्य मानणारे बहुसंख्य आहेत. उरलेले पाच दिवस मग ते कशी तग धरू शकतात? संपूर्ण श्रावण महिना आणि आठवड्यातले पाच दिवस नित्याचे मांसाहारी मांसभक्षण करीत नाहीत तेव्हा केवळ त्याच व्यवसायावर ज्यांचे पोट आहे, त्यांच्या पोटाची काळजी कोण वाहत असते? तरीही रोज मांसमच्छी खाल्ल्याशिवाय ज्यांचे पानच हलू शकत नाही असेच बहुसंख्य लोक महाराष्ट्रात आहेत, असे गृहीत धरले आणि त्यांनी त्यांच्या होणाऱ्या संभाव्य उपासमारीसाठी आकाश-पाताळ एक करण्याचा उपक्रम सुरू केला तर लोकशाहीने त्यांना तो अधिकार दिलाच आहे. पण लोकशाहीने कोणालाही परधर्माविषयी आणि परधर्माच्या आस्थांविषयी अत्यंत हिणकस उद्गार काढण्याचा अधिकार दिलेला नाही. का मग येथेही बहुसंख्य आणि अल्पसंख्य असा भेद केला जातो आणि जे अल्पसंख्य आहेत पण आक्रमक नाहीत कारण त्यांच्या धर्मातच अहिंसा आहे त्यांची अवहेलना करण्याची मोकळीक आहे, असे मानले जाते. महाराष्ट्रातील तमाम मांसभक्षकांचे केवळ आपणच तारणहार आहोत असे मानणाऱ्यांच्या दुभंगातून एरवी किरकोळ वाटणारा वाद गलिच्छपणाच्या मर्यादा पार करून गेला आहे. जैन धर्मातील दिगंबरांची अवहेलना करतानाच त्र्यंबकेश्वरी जमणाऱ्या नागा साधूंच्या दर्शनाची अभिलाषा बाळगणाऱ्यांनी जरा त्या नागा साधूंविषयीदेखील असेच हिणकस उद्गार काढून पाहावेत. ‘रक्त की नदीयाँ बहेंगी’! दुर्बळांवर वा अहिंसेचा स्वीकार करणाऱ्यांवर वार करण्यात कोणते आले आहे मोठे शौर्य? ‘आमच्या खाण्या-पिण्यावर बंदी आणणारे कोण? आम्हाला घटनेनेच आहार स्वातंत्र्य दिले आहे,’ अशी वकिली करणारे उद्या नरमांसभक्षकही होणार आहेत? होतीलही कदाचित. पण तेव्हा येईल ती राज्यघटना त्यांच्या मदतीला?