शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

...आणि आईचे दूधच बाळाच्या जिवावर बेतले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2016 12:33 IST

आईचे दूधच बाळाच्या जिवावर बेतल्याची मन सुन्न करणारी घटना मंगळवारी मुलुंडमध्ये घडली.

मनीषा म्हात्रे,

मुंबई- आईचे दूधच बाळाच्या जिवावर बेतल्याची मन सुन्न करणारी घटना मंगळवारी मुलुंडमध्ये घडली. आईचे अज्ञान आणि वेळीच न मिळालेल्या उपचारामुळे पहिल्या वाढदिवसाच्या केवळ दोन दिवस आधीच या बाळावर जीव गमावण्याची वेळ आली. तब्बल दोन तास या तान्हुल्याला घेऊन ही माता मृत्यूशी झगडत होती. युग अजय सिंग असे मृत बाळाचे नाव आहे. तो आई-वडील आणि दोन भावंडांसोबत राहायचा. वडील अजय हे फिल्मसिटीमध्ये डेकोरेटर म्हणून काम करतात, तर आई लक्ष्मी ही गृहिणी आहे. युग हे त्यांचे तिसरे अपत्य. १ जुलैला युगचा पहिला वाढदिवस थाटामाटात साजरा करण्यासाठी सिंग यांच्या घरी तयारी सुरू होती. युगला घेऊन त्याची आई मुलुंडच्या आजीकडे राहण्यास आली होती. मुलुंड पश्चिमेकडील पळसपाडा परिसरात त्याची आजी राहते. मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास युगला खाटेवर बसवून आईने घरातील काम आवरण्यास घेतले. तेव्हा खेळता-खेळता युग खाटेवरून खाली कोसळला. डोक्याला मार लागल्याने युगने हंबरडाच फोडला. आईने युगकडे धाव घेत त्याला उराशी घट्ट धरले. त्याचे रडणे थांबावे म्हणून त्याला दूध पाजले. मात्र तरी युगचे रडणे काही थांबत नव्हते. मुलाला उराशी घेऊन तिने जवळच्या क्लिनिकमध्ये धाव घेतली. मात्र तेथेही त्याच्यावर वेळेवर उपचार झाले नाहीत. अशात तब्बल दोन तास मृत्यूशी झुंज देत असलेल्या युगला घेऊन लक्ष्मी फेऱ्या मारत होती. अशातच युगचे रडणे अचानक थांबले. दूध पिऊन बाळ झोपले असावे, असा अंदाज तिने बांधला. फॅमिली डॉक्टरने बाळाला मुलुंडच्या अग्रवाल रुग्णालयात नेण्यास सांगितले. कोसळणाऱ्या पावसात डोळ्यातील अश्रू आणि बाळाला घट्ट पकडून ती अग्रवाल रुग्णालयात दाखल झाली. तेथील डॉक्टरांनी दाखल करण्यापूर्वीच त्याला मृत घोषित केले. त्यानंतर ‘अहो माझा युग शांत का झाला? त्याला उठवाना...’ अशा आईच्या आकांताने तेथे उपस्थित सारेच गहिवरले.या घटनेने सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकला. घटनेची माहिती मिळताच मुलुंड पोलीस तेथे दाखल झाले. युगचा मृतदेह ताब्यात घेत रात्री साडेनऊच्या सुमारास शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालयात पाठविण्यात आला. प्राथमिक तपासात युगच्या डोक्याला मुका मार लागला असताना त्याला दूध पाजल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले. डोक्याला मार लागल्यानंतर द्रव पदार्थ (दूध) पोटात गेल्याने ते मेंदूपर्यंत पोहोचून मृत्यूस कारणीभूत ठरू शकते, असे अग्रवाल रुग्णालयातील डॉक्टरांचे म्हणणे आहे. युगबाबतही हेच झाले. किमान त्याच्यावर वेळीच उपचार झाले असते, तर तो वाचला असता. मात्र संबंधित डॉक्टरांनीही त्याकडे दुर्लक्ष केले. यात मातेचे अज्ञान आणि वेळीच योग्य उपचार न मिळणे या दोन बाबी त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या. या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करत अधिक तपास सुरू असल्याची माहिती मुलुंड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राजाराम व्हनमाने यांनी ‘लोकमत’ला दिली. बुधवारी दुपारच्या सुमारास युगचा मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. गोरेगाव परिसरात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.