शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

...अन् स्मृती इराणी रमल्या खरेदीत !

By admin | Updated: February 20, 2016 01:14 IST

रस्त्याने जाताना दुकानात एखादी आकर्षक वस्तू दिसली, की ती वस्तू आपल्या घरात असावी, असा मोह महिलांना असतो

पुणे : रस्त्याने जाताना दुकानात एखादी आकर्षक वस्तू दिसली, की ती वस्तू आपल्या घरात असावी, असा मोह महिलांना असतो. देशाच्या राजकारणातील एक उमदे आणि महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व व केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री असलेल्या स्मृती इराणी यांनाही पुण्यात हा मोह आवरता आला नाही. शुक्रवारी कर्वेनगरमधील एका कार्यक्रमानंतर त्यांचा ताफा कोथरूडमधून मुख्य रस्त्याने जात असताना तो अचानक एका भांड्याच्या दुकानासमोर थांबला. केंद्रीय मंत्री म्हणून कोणताही बडेजाव न करता अगदी साधेपणाने त्या दुकानात शिरल्या अन् चक्क भांडी न्याहाळू लागल्या. त्यामुळे दुकानदारही भांबावून गेला. तर केंद्रीय मंत्र्यांना भांडी खरेदी करताना पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी उसळली. केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी शुक्रवारपासून दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर आहेत. शुक्रवारी सकाळी आयसरमध्ये आणि दुपारी डेक्कन कॉलेजमध्ये त्यांचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमानंतर सायंकाळी कर्वेनगर येथील कमिन्स कॉलेजच्या रौप्यमहोत्सवी समारंभात त्या प्रमुख पाहुण्या होत्या. हा कार्यक्रम झाल्यानंतर मंत्र्यांचा ताफा कर्वेनगरमधून कोथरूडच्या दिशेने निघाला. कोथरूडमध्ये मुख्य रस्त्यावर जात असताना त्यांची गाडी अचानक एका भांड्याच्या दुकानासमोर येऊन उभी राहिली. लाल दिव्याची गाडी थांबल्याने आजूबाजूने जाणाऱ्या लोकांच्या नजराही खिळून राहिल्या. गाडीतून चक्क केंद्रीय मंत्री स्मृती इराणी या उतरल्याचे पाहून सगळे अवाक झाले.गाडीतून उतरून इराणी थेट भांड्यांच्या दुकानात गेल्या अन् त्यांची भांडी खरेदीची लगबग सुरू झाली. केंद्रीय मंत्र्याच्या अचानक येण्याने दुकानदारही भांबावून गेला. दुकानाबाहेर लाल दिव्याची गाडी अन् पोलीस पाहून ये-जा करणाऱ्यांचीही त्यांना पाहण्यासाठी गर्दी झाली होती.खरेदीच्या गडबडीतही त्या बाहेर उभ्या असलेल्या लोकांना हात करून प्रतिसाद देत होत्या. त्यानंतर त्यांनी अनेकांना आपल्यासोबत सेल्फी काढण्याची संधी दिली. लोकांशी मनमोकळा संवादही साधला. त्यातही मंत्री महोदयांनी महिलांना प्रथम प्राधान्य दिले. काहींनी सरकारचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या. इराणी यांनीही या शुभेच्छांचा आनंदाने स्वीकार करीत खरेदीचा आनंद लुटला. ‘‘केंद्रीय मंत्री असल्याचा कुठलाही बडेजाव न आणता स्मृती इराणी यांनी लोकांशी संवाद साधला. आमच्यासोबत फोटो काढले. इतका साधेपणाने लोकांमध्ये मिसळणारा केंद्रीय मंत्री आम्ही पहिल्यांदाच पाहिला,’’ अशी भावना दुकानात उपस्थित असलेल्या प्रा. जयश्री अरुण मोकाशी यांनी व्यक्त केली.