शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

... आणि सा-यांचा जीव भांड्यात पडला !

By admin | Updated: June 30, 2016 16:24 IST

शालेय सत्राच्या तिस-याच दिवशी चिमुकलीचे अपहरण झाल्याची शंका आल्याने पालकांसह पोलीसही अस्वस्थ झाले. हादरलेले पोलीस चिमुकलीची शोधाशोध करू लागले.

ऑनलाइन लोकमतनागपूर, दि.३० -  शालेय सत्राच्या तिस-याच दिवशी चिमुकलीचे अपहरण झाल्याची शंका आल्याने पालकांसह पोलीसही अस्वस्थ झाले. हादरलेले पोलीस चिमुकलीची शोधाशोध करू लागले. दोन तासातच ती आढळली अन् तिला पाहून पालकांसह पोलिसांचाही जीव भांड्यात पडला.वेदिका नरेंद्र गौर (वय ९ वर्षे) हिच्या कथित अपहरणाचा हा किस्सा आहे. धरमपेठच्या आदर्श शाळेत चवथीत शिकणारी वेदिका बुधवारी सकाळी नेहमीप्रमाणे काछीपु-यातून पायीच शाळेला गेली. सकाळी ११ वाजता शाळा सुटली. मात्र, १२ वाजले तरी ती घरी पोहचली नाही. त्यामुळे पालकांनी तिच्या शाळेत जाऊन पाहिले. ती दिसली नाही. पुन्हा घरी आले. ती घरी पोहचलीच नव्हती. वेदिकाच्या वर्गमैत्रीणींकडे विचारणा केली असता ह्यती शाळेत आली होती. सुटी झाल्यानंतर घराकडे निघाली. कुठे गेली ते माहित नाहीह्ण, असे तिच्या मैत्रीणींनी सांगितले. परिणामी वेदिकांच्या पालकांच्या काळजाचा ठोका चुकला . तिला पळवून नेले असावे, अशी शंका घेत त्यांनी दुपारी २.३० वाजता सीताबर्डी पोलीस ठाणे गाठले. वेदिकाच्या बेपत्ता होण्याची तक्रार नोंदवून तिच्या अपहरणाचा संशय तक्रारीत व्यक्त केला.शालेय सत्र सुरू होऊन अवघे तीन दिवस झाले असताना शाळकरी मुलीच्या अपहरणाची तक्रार आल्याने पोलीसही हादरले. ठाणेदार सत्यवीर बंडीवार यांनी लगेच वेदिकाला शोधून काढण्याचे आदेश दिले. त्यानुसार, पोलीस उपनिरीक्षक अरुण नागरे यांनी गुन्हा दाखल केला. पीएसआय पवार, पीएसआय शेजव यांच्या नेतृत्वात दोन वेगवेगळी पथके वेदिकाला शोधू लागली. एक शोधपथक दुपारी ३.३० च्या सुमारास शाळेच्या आवारात चौकशीला गेले. अन्...शाळेच्या आवारात वेदिका आढळली. ती सुखरूप होती. कुठेच गेली नव्हती अन् अपहरणाचा तर प्रश्नच नव्हता. तिला निरागसपणे शिक्षीकेसोबत गप्ता मारताना पाहून आईने लगेच आपल्या पदरात घेतले. तिचे लाडकौतूक केले. आईवडील, पोलीसांचा ताफा पाहून शाळेत कुजबूज वाढली. काय झाले, अशी विचारणा होऊ लागली. वेदिकाच्या अपहरणाची शंका आल्याने पोलीस तिची शोधाशोध करीत होते, असे कळाल्याने सर्वच अचंबित झाले. समुपदेशन ्अन् घरवापसी सीताबर्डी पोलिसांनी दुपारी ४ च्या सुमारास वेदिकाला तिच्या आईवडीलांच्या स्वाधिन केले. तत्पुर्वी, कुण्या अनोळखी व्यक्तीने काही दिल्यास काही घ्यायचे नाही, त्या व्यक्तीच्यासोबत जायचे नाही, वेदिकाचे समुपदेश करण्यात आले. हो, हो करीत तिनेही पोलिसांचा निरोप घेतला.