शहरं
Join us  
Trending Stories
1
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
2
पाकिस्तानात लष्करी सराव की पुन्हा सतावतेय भारताकडून एअरस्ट्राइक होण्याची भीती? घेतला मोठा निर्णय 
3
कर्नाटक काँग्रेसचा अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर; उपमुख्यमंत्र्यांचे नाव घेण्यास मुख्यमंत्र्यांचा नकार
4
घटस्फोटानंतर पत्नीला नाही द्यायचा संपत्तीचा एकही हिस्सा; श्रीमंत लोक काय वापरतायेत 'फंडा'? वाचा
5
पुढील आठवड्यांत IPO चा धमाका: तब्बल १० कंपन्या बाजारात उतरणार, गुंतवणुकीची सुवर्णसंधी!
6
“शेतकऱ्यांनो विसरा हमी… खेळा रम्मी…”; कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंवर विरोधकांची सडकून टीका
7
बांगलादेशच्या आयातबंदीचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका; पावसामुळे कमी भावांत विकण्याची वेळ 
8
ISIS स्टाईलने हिंदू मुलींचे ब्रेनवॉश; लष्कर-ए-तैयबाच्या निधीतून सुरू होते आग्रा धर्मांतर नेटवर्क
9
धक्कादायक: शिक्षकांना नियमित केले, परंतु आदेश तात्पुरते राहिले, तासिका व रोजंदारीवरच दिल्या नियुक्त्या
10
वनविभागात ‘आयएफएस’ पदांचा खेळ; आता ८ पीसीसीएफ, वनसंरक्षक पदाला कात्री आणि बदल्यांमध्ये सोय
11
"राणे कुटुंबाने खून केलेले लोक हिंदूंच होते, नितेश राणेंनी वडिलांना..."; मनसे नेत्यांचे खळबळजनक आरोप
12
“बोले तैसा चाले आहे की वाकडी यांची पाऊले ते कळेल”; निवृत्तीवरून ठाकरेंचा RSS-मोदींना टोला
13
पगारातून कापला गेलेला TDS आता सहज परत मिळणार, सरकार बदलणार नियम, कधीपासून लागू?
14
'डॉन ३' मधून विक्रांत मेस्सी बाहेर, 'बिग बॉस' विजेता अभिनेता बनणार व्हिलेन? नवी अपडेट समोर
15
सावधान, पावसाळ्यात सर्पदंशाचा धोका अधिक! कशी घ्याल स्वतःची काळजी?
16
'सन ऑफ सरदार २' पोस्टपोन, 'या' सिनेमाला घाबरुन बदलली रिलीज डेट? नवीन तारीख समोर
17
अरेच्चा...! पत्नी मागेच राहिली, केंद्रीय मंत्र्याने १ किमीवरून ताफा पुन्हा मागे वळवला; काय घडलं?
18
"कमी जागा मिळो अथवा जास्त, मुख्यमंत्री नितीश कुमारच होणार", जदयूचा भाजपला स्पष्ट मेसेज, एनडीएमध्ये पेच
19
गिरगाव चौपाटीवर मासेमारीस मज्जाव? बंदर बंद झाल्याने बोटी हटविण्याचे मच्छीमारांना आदेश
20
पाकिस्तान समर्थक जमात ए इस्लामीने बांगलादेशात दाखवली ताकद; देशात इस्लामिक राजवटीचे संकेत?

...आणि वकिलाच्या पत्नीने पोलीस ठाण्यातच घेतला पतीचा चावा

By admin | Updated: March 1, 2017 01:59 IST

पोलीस ठाण्यात पतीचा कडकडून चावा घेत मुलीचा ताबा मिळविल्याची धक्कादायक घटना मुलुंडमध्ये घडली.

मनीषा म्हात्रे,मुंबई- पती-पत्नीच्या वादानंतर मुलगी आपल्यासोबत राहावी म्हणून अ‍ॅड. पत्नीने पोलीस ठाण्यात पतीचा कडकडून चावा घेत मुलीचा ताबा मिळविल्याची धक्कादायक घटना मुलुंडमध्ये घडली. जखमी पतीच्या तक्रारीवरून मुलुंड नवघर पोलिसांनी अ‍ॅड. पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.मुलुंड पूर्वेकडील नवघर परिसरात हे हायप्रोफाईल दाम्पत्य राहते. २००९मध्ये निरजची (नाव बदलले आहे) सोशल मीडियावरील विवाह नोंदणी स्थळावर नेहासोबत (नावात बदल) भेट झाली. निरज मराठी तर नेहा बंगाली. नेहा अ‍ॅड. तर निरजने एमबीए फायनान्सची पदवी घेतलेली. त्यानंतर तो एका नामांकित कंपनीत उच्चपदावर काम करत होता. दोघांचा विवाह झाला. मात्र लग्नाच्या वर्षभरातच नेहाच्या तापट स्वभावामुळे दोघांमध्ये खटके उडायला सुरुवात झाली. हे प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचले. तरीदेखील दोघांमधील वाद सुरूच होते. २५ तारखेच्या रात्री दोघांमध्ये पुन्हा भांडण झाले. नेहाने निरजला मारहाण करून घराबाहेर काढले. तो दोन वर्षांच्या मुलीसोबत बाहेर पडला. नेहाने थेट नवघर पोलीस ठाणे गाठून दोघे हरविल्याची तक्रार दिली. नेहाच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवून पोलिसांनी तपास सुरू केला. अशात निरजचा फोन सुरू होताच त्याला पोलीस ठाण्यात बोलाविण्यात आले. मात्र या घटनेमुळे निरजलाही धक्का बसला. त्यात पोलिसांनी दोघांची समजूत काढण्यासाठी नेहालाही तेथे बोलावून घेतले. त्या वेळेस निरजने पोलिसांना विनवणी केली, की पत्नीला बोलावू नका. अखेर काही वेळातच नेहा तेथे दाखल होताच तिने निरजकडून मुलीला आपल्या ताब्यात घेण्यासाठी वाद सुरू केला. वाद एवढा टोकाला पोहोचला की मुलीचा ताबा मिळविण्यासाठी तिने त्याच्या हातावर कडकडून चावा घेतला. पोलिसांच्या मदतीने तिला त्याच्या हातापासून दूर करण्यात आले. या चाव्यात त्याच्या हातावर खोलवर जखम झाली आणि तो खाली कोसळला. त्याला जवळच पालिकेच्या सावरकर रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेच्या दिवशी नेहाने वृद्ध आईलाही मारहाण केली. त्यामुळे त्यांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे निरजने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.>परिसरात खळबळ सोमवारी त्याने नवघर पोलीस ठाण्यात नेहाविरुद्ध तक्रार दिली. त्याच्या तक्रारीवरून ३२४चा गुन्हा दाखल करून अधिक तपास सुरू केला असल्याची माहिती नवघर पोलिसांनी दिली. पोलिसांसमोरच रंगलेल्या या ड्रामामुळे मुलुंड परिसरात खळबळ उडाली होती.