शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

... अन् जखमी वासरं 'माणुसकी'नं भारावली !

By admin | Updated: August 10, 2016 16:24 IST

भाकड गायी अन निरूपयोगी वासरे रस्त्यावर बेवारस सोडण्याच्या घटना वाढत आहेत. वाई येथील औद्योगिक वसाहतीत मोकाट कुत्र्यांनी अशाच दोन बेवारस

ऑनलाइन लोकमत

वाई ( सातारा), दि. 10 - भाकड गायी अन निरूपयोगी वासरे रस्त्यावर बेवारस सोडण्याच्या घटना वाढत आहेत. वाई येथील औद्योगिक वसाहतीत मोकाट कुत्र्यांनी अशाच दोन बेवारस वासरांचे अक्षरश: लचके तोडले. तेव्हा, घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी प्रसंगावधान राखून वासराचे प्राण वाचविले. आता या वासरांना करुणा मंदिर गोशाळेच्या रुपाने हक्काचा निवारा मिळाला आहे.वाई शहरात भाकड जनावरांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. बसस्थानक परिसरासह वसाहतींमध्ये जनावरांचा नेहमीच वावर असतो. येथील औद्योगिक वसाहतीमध्ये असाच एक प्रसंग उद्भवला. दोन बेवारस वासरांवर मोकाट कुत्र्यांनी हल्ला चढविला. या हल्ल्यात दोन्ही जनावरं गंभीररीत्या जखमी झाली. वासरांच्या केविलवाण्याओरडण्याचा आवाज ऐकून सुनील पानसे, दिनेश भुजबळ, नंदकुमार जाधव यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी त्यांनी जीव धोक्यात घालून पिसाळलेल्या कुत्र्यांच्या तावडीतून बिचाऱ्या जखमी वासरांची सुटका केली.  तालुका पशुधन अधिकारी डॉ़  सुनील देशपांडे यांनी त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले. त्यानंतर गो-रक्षक दलाचे कार्यकर्ते स्वप्नील भिलारे, ऋषी द्गडे, तृप्तेश लांजेकर, ऋशीराज जगताप यांनी जखमी वासरांची वेळे येथील 'करुणा मंदिर गोशाळे'त रवानगी केली. अखेर मृत्यूच्या दाढेतून वासरे गो शाळेत जाऊन विसावली.