शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
3
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
4
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
5
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
6
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
7
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
8
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
9
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
10
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
11
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
12
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
13
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
14
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
15
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
16
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
17
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
18
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
19
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
20
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...

...तर माझाही कन्हैया होईल : नाना पाटेकर

By admin | Updated: April 9, 2016 09:35 IST

मी नट म्हणून बोललो की, माझा कृष्ण म्हणून गौरव होतो, तेच मी कार्यकर्त्याच्या भूमिकेतून बोललो तर माझा कन्हैया होईल. जागा बदलली की भूमिका बदलते.

पुणे : मी नट म्हणून बोललो की, माझा कृष्ण म्हणून गौरव होतो, तेच मी कार्यकर्त्याच्या भूमिकेतून बोललो तर माझा कन्हैया होईल. जागा बदलली की भूमिका बदलते. एखादी भूमिका घेतल्यानंतर त्याचे होणारे परिणाम भोगण्याची तयारी आमच्याकडे नाही, त्यामुळे आपण ठाम भूमिका घेत नाही. ठाम भूमिका घेऊन त्याचे परिणाम भोगण्याची तयारी ठेवली पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी केले.अच्युत गोडबोले व नीलांबरी जोशी यांनी विदेशी चित्रपटसृष्टीवर लिहिलेल्या ‘लाइमलाइट’ या पुस्तकाचे प्रकाशन पाटेकर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल, अच्युत गोडबोले, नीलांबरी जोशी, मनोविकास प्रकाशनचे अरविंद पाटकर उपस्थित होते. नाना पाटेकर म्हणाले, ‘‘मराठवाडा, खान्देश, विदर्भात फिरल्यानंतर माझी दु:खाची व्याख्या बदलली. पाणी, वीज या मूलभूत गोष्टीही आपण त्यांना देऊ शकलेलो नाही. त्यांना वंचित ठेवणे ही काहींची गरज असल्यामुळे कदाचित असे घडले असेल. नाम फाउंडेशनच्या माध्यमातून लोकांनी आतापर्यंत ३० कोटी रुपयांची मदत केली आहे. यातून विधवा महिलांना मदतीचे धनादेश देण्याची तात्पुरती मलमपट्टी केली. त्याचबरोबर ३६५ किलोमीटर नदीपात्र विस्तीर्ण करण्याचे काम यातून करण्यात आले. शासकीय यंत्रणेला हेच काम करण्यास अनेक वर्षे लागली असती. अच्युत हा लिहिण्यापेक्षा सांगतो. गोष्ट सांगितल्याप्रमाणे तो पुस्तकातून लिहितो. त्यामुळे त्याचे लिखाण वाचायला कंटाळा येत नाही, ते बोजड वाटत नाही अशा शब्दांत पाटेकर यांनी अच्युत गोडबोले यांचा गौरव केला.जब्बार पटेल म्हणाले, ‘‘जगात वेगळे काही करणाऱ्या मंडळींवर हे पुस्तक लिहिले आहे. विदेशी चित्रपटाला सर्वांगीण स्पर्श करण्याचा प्रयत्न या पुस्तकामध्ये केला आहे. शेतकऱ्यांसाठी काम करणारा नाना आणि बिहारमधील लोकांच्या मदतीसाठी धावून येणारा प्रसिद्ध अभिनेता ब्रॅन्डो यांचे नाते असल्याचे दिसून येते.’’अच्युत गोडबोले यांनी सांगितले, ‘‘विदेशी साहित्य, चित्रपट, संगीत यावर लिहिण्याचा मानस केला होता. त्यानुसार साहित्यावर झपुर्झाचे दोन भाग लिहिले. त्यानंतर चित्रांवर कॅनव्हास लिहिले. चित्रपटांविषयी लाइमलाइट या पुस्तकांमध्ये सविस्तर मांडणी केली आहे.’’ (प्रतिनिधी)