शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

...अन् पुरात अडकलेल्या बसमधील प्रवाशांची सुटका!

By admin | Updated: August 12, 2016 04:39 IST

नदीच्या फरशीवरून पुराचे पाणी वाहत असतानाही मोठ्या पुलावरून बस न घेता बेजबाबदारपणे फरशीवरून बस नेताना ती पुरात अडकली

नवापूर (जि. नंदुरबार) : नदीच्या फरशीवरून पुराचे पाणी वाहत असतानाही मोठ्या पुलावरून बस न घेता बेजबाबदारपणे फरशीवरून बस नेताना ती पुरात अडकली. त्यातच बस बंद पडल्यानंतर पाण्याचा वेग वाढला. मात्र वाहकाने सावधानता दाखवित तातडीने १०० क्रमांकावर फोन केला आणि पोलीस पथक मदतीला धावले. त्यामुळे १८ प्रवाशांची सुटका झाली. नवापूरमधील रंगावली नदीच्या पुरात हा थरार गुरुवारी सकाळी सुरू होता.वाहकाच्या प्रसंगावधानामुळे महाडच्या दुर्घटनेची पुनरावृत्ती येथे टळली. बेजबाबदार बसचालक राकेश साबळे यास निलंबित करण्यात आले असून संध्याकाळी त्याच्यावर गुन्हा दाखल झाला. जालना आगाराच्या जालना- सूरत एस.टी. बसने पहाटे पाच वाजेच्या सुमारास नवापूर बसस्थानक सोडले़ नवापूरमधील रंगावली नदीच्या फरशीवरून पाणी वाहत असल्याने वाहक कैलास धनराज पाटील यांनी साबळे यास बस फरशीवरून नेवू नका, असे असे बजावले. मात्र अतिविश्वासात साबळेने बस पुढे घेतली, तेव्हा फरशीच्या मधोमध पुराच्या पाण्यात ती अडकली़ बसच्या सायलेंसरमध्ये पाणी गेल्याने ती बंद पडली़ खिडक्यांपर्यंत पुराचे पाणी आले होते. घाबरलेल्या प्रवाशांनी आरडाओरड करण्यात सुरुवात केली. पाटील यांनी प्रसंगावधान राखून मदतीसाठी पोलिसांच्या १०० क्रमांकावर, तसेच एसटीच्या अधिकाऱ्यांना घटनेची खबर दिली़ रात्री गस्तीवर असलेले सहायक पोलीस निरीक्षक दिलीप बुवा यांना माजी नगरसेवक सोहेल बलेसरिया व रमेशचंद्र राणा यांनीही खबर दिली़ पोलीस व जागरूक नागरिकांनी नदीपात्राकडे तातडीने धाव घेतली़ जेसीबी मागवून लोखंडी केबलने बस रोखून धरण्यात आली. लोकांनी चालक-वाहकासह सर्व १८ प्रवाशांना अवघ्या काही मिनिटांत सुखरुप बाहेर काढले़ बसमध्ये अरुण जनसिंग राठोड, योगिता अरुण राठोड (दोन्ही रा़ जळगाव), शोभा देवीदास पवार, देवीदास व्यंकट पवार (दोन्ही़ रा पंढरपूर), रशीद बाबमिया अन्नार (रा़ जालना), एकनाथ महादेव गमे व मजहरखान फैजुल्ला पठाण (दोन्ही राग़ेवराई), पिंटू भावजी चौहान, राजेश मोहन परमार (दोन्ही रा़ भावनगर, गुजरात), रामदास विश्वनाथ तेलंग (रा़उमरगा), भास्कर राजाराम नवेरे (रा़ चाळीसगाव), प्रवीणचंद्र कांतीलाल नगारिया (रा़ जाफराबाद), जाकीरशा शब्बीरशा पठाण (रा़ खंडवा), रेगाधीश रोहित बंदुकिया (रा़ जालना) यांना तातडीने बाहेर काढण्यात आले. (प्रतिनिधी)