नागपूर : दुभंगलेले ओठ किंवा चेहऱ्याच्या विद्रुपतेसह जगताना जीवाची फार तगमग होत असते. शस्त्रक्रिया हाच यावर उपाय. याचे गांभीर्य ओळखून भारतीय जैन संघटना, जैन क्लब नागपूर व राधाकृष्ण हॉस्पिटल अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूटद्वारा दोन दिवसीय ‘नि:शुल्क प्लास्टिक सर्जरी’ शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिराच्या पहिल्याच दिवशी सोमवारी १०२ जणांवर यशस्वी शस्त्रक्रिया करून त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलविले.मनोहरलालजी ढढ्ढा यांच्या स्मृतिनिमित्त वर्धमाननगर येथील राधाकृष्ण हॉस्पिटलमध्ये आयोजित या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी प्रसिद्ध प्लास्टिक सर्जन डॉ. लॅरी वेन्स्टेन, डॉ. बॅरी सिट्रॉन, डॉ. लेह, इंडियन मेडिकल असोसिएशन नागपूर शाखेचे अध्यक्ष डॉ. आनंद काटे व अन्य मान्यवर उपस्थित होते.विदर्भासह छत्तीसगडमधून एक वर्षाच्या बाळापासून ते ५० वर्षांच्या रुग्ण या शिबिरात आले होते.दुपारी २ वाजेपासून ते रात्री ७ वाजेपर्यंत सलग सहा तास शस्त्रक्रिया चालल्या. सर्व शस्त्रक्रिया यशस्वी पार पडल्या.
...अन् त्यांच्या चेहऱ्यावर फुलले हसू
By admin | Updated: January 12, 2016 03:11 IST