शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

...आणि उमाताई झाल्या स्तब्ध

By admin | Updated: March 3, 2015 02:17 IST

ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या निधनाची बातमी त्यांच्या पत्नी उमातार्इंना समजताच त्या ‘स्तब्ध’ झाल्या.

कोल्हापूर : ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या निधनाची बातमी त्यांच्या पत्नी उमातार्इंना समजताच त्या ‘स्तब्ध’ झाल्या. अण्णांच्या निधनाच्या धक्क्यामुळे काही काळ त्यांच्या तोंडातून एकही शब्द फुटला नाही. त्यांची प्रकृती लक्षात घेऊन डॉक्टरांनी रविवारी त्यांना अण्णांच्या निधनाचे वृत्त सांगितले.अण्णांना उमातार्इंनी आयुष्यभर सावलीसारखी साथ दिली. हल्लेखोरांनी झाडलेल्या गोळ्या पानसरे अण्णांबरोबरच आपल्या अंगावर त्यांनी झेलल्या. अण्णांचे निधन झाल्याचे कसे सांगायचे, असा प्रश्न त्यांच्या कुटुंबीयांना पडला होता. हल्ल्यात उमातार्इंच्या मेंदूला झालेली इजा आणि त्यांची प्रकृती सुधारावी यासाठी कुटुंबीयांनी त्यांना अण्णांच्या निधनाची माहिती दिली नव्हती. दहा दिवसांपासून उमातार्इंची प्रकृती दिवसागणिक सुधारत आहे. त्यांना व्हीलचेअरवरूनही फिरविण्यात येत आहे. त्या बोलू लागल्यानंतर प्रत्येक दिवशी साहेबांची तब्येत बरीआहे ना, त्यांची काळजी घ्या, असे त्यांना भेटणाऱ्या नातेवाईक आणि पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांना त्या सांगत होत्या.रविवारी अण्णांच्या निधनाची बातमी समजताच त्यांनी आपल्या बहिणींजवळ अश्रूंना वाट मोकळी करून दिली. त्यांनी सोमवारी रुग्णालयातील अतिदक्षता कक्षाबाहेर मोकळ्या जागेत व्हीलचेअरवरून फेरी मारली. (प्रतिनिधी)पानसरेंवरील चर्चा लोकसभेत थांबली नवी दिल्ली : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यानंतर महाराष्ट्रात पुढचे लक्ष्य कोल्हापूरचे अ‍ॅड. पानसरे असतील, असा आयबीचा अहवाल होता. तरीही सरकारने पानसरे यांना सुरक्षा पुरविली नाही. आता तिसऱ्या टार्गेटची चर्चा सुरू आहे, असे राजीव सातव यांनी लोकसभेत शून्य प्रहरात म्हटले. त्या वेळी राज्यमंत्री राजीव प्रताप रुडी यांनी म्हटले, हा विषय गंभीर आहे. पण राज्याशी संबंधित असल्याने तो लोकसभेत उपस्थित करू नये. यावर सातव यांनी रुडी यांना राज्याशी संबंधित पण लोकसभेत चर्चा झालेले पूर्वीचे काही विषय सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी रुडी म्हणतात ते योग्य आहे, असे सांगून विषय थांबविला. (विशेष प्रतिनिधी)