शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

...तर चौघुले यांनाही अटक करा

By admin | Updated: May 18, 2016 02:32 IST

भाजपा आमदार महेश चौघुले यांच्या समर्थकांकडून झालेल्या मारहाणीत रिपब्लिकन पक्षाचा कार्यकर्ता विकी ढेपे याचा मृत्यू झाला.

वज्रेश्वरी : भाजपा आमदार महेश चौघुले यांच्या समर्थकांकडून झालेल्या मारहाणीत रिपब्लिकन पक्षाचा कार्यकर्ता विकी ढेपे याचा मृत्यू झाला. या घटनेत चौघुले दोषी असल्यास त्यांना अटक करावी अशी मागणी रिपाइं अध्यक्ष रामदास आठवले यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केली. तसेच विकीच्या बहिणीला भिवंडी पालिकेत नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.विकीच्या घरी जाऊन आठवले यांनी त्याच्या कुटुंबाचे सांत्वन केले. दरम्यान, विकीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सरकारकडून मदत मिळण्यासाठी प्रयत्न करीन असे ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन या हत्येची सीआयडी चौकशी करण्याची मागणी करणार असल्याचे ते म्हणाले. या हत्येला कुणीही राजकीय रंग देऊ नये असेही त्यांनी नमूद केले. दलितांवर झालेला हल्ला आहे यादृष्टीने तपास करावा अशी विनंती पोलिसांना केल्याचे त्यांनी सांगितले.विकीच्या हत्येनंतर भिवंडीत तणावाचे वातावरण होते. चौघुले यांना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही आणि अंत्यसंस्कार केले जाणार नाहीत अशी भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली होती. हत्येच्या निषेधार्थ सोमवारी मोर्चाही काढला होता. वऱ्हाळनगर येथून अंत्ययात्रा निघाली. रिपाइंचे शहराध्यक्ष महेंद्र गायकवाड, प्रा. सुमित्र कांबळे, गुणवंत शिंदे ,अनिल गायकवाड , बालाजी कांबळे सहभागी झाले होते. कामतघर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले .दरम्यान, आठवले यांच्या सूचनेनुसार शहर उपाध्यक्ष रवी गुज्जा यांनी एक लाखाची मदत विकीच्या कुटुंबासाठी देण्याचे जाहीर केले. (वार्ताहर)