शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

अनास्थेचा ‘मेंटल ब्लॉक’

By admin | Updated: January 6, 2015 01:08 IST

गुराढोरासारखे कोंबले जावे तसे अ‍ॅम्ब्युलन्समध्ये मनोरुग्णांना कोंबून उपचारासाठी ने-आण केली जात आहे. केवळ प्रशासकीय दिरंगाईचा हा फटका मागील अनेक वर्षांपासून रुग्णांना बसत आहे.

प्रादेशिक मनोरुग्णालय : अ‍ॅम्ब्युलन्समध्ये रुग्णांना कोंबून प्रवास नागपूर : गुराढोरासारखे कोंबले जावे तसे अ‍ॅम्ब्युलन्समध्ये मनोरुग्णांना कोंबून उपचारासाठी ने-आण केली जात आहे. केवळ प्रशासकीय दिरंगाईचा हा फटका मागील अनेक वर्षांपासून रुग्णांना बसत आहे. वेड्यांकडे काय लक्ष द्यायचे, अशा भावनेतूनच आरोग्य खाते काम करीत असल्याचे हे चित्र आहे. सरकारी अनास्थेमुळे नागपूरच्या प्रादेशिक मनोरुग्णालयाची अवस्था बिकट झाली आहे. दररोजच्या ताणतणावांमुळे मनोरुग्णांची संख्या वाढत असताना, आजही जुन्याच पद्धतीचे उपचार व औषधांचा वापर सुरू आहे. तुरु ंगातल्या कैद्यांपेक्षाही इथल्या रुग्णांची अवस्था दयनीय आहे. लालफितीची मनमानी, अपुरा निधी, आवश्यक औषधांचा तुटवडा, डॉक्टरांची कमतरता, पर्यायी उपचारांची वानवा अशा त्रुटींमुळे इथल्या कारभाराचा बोजवारा उडाला आहे. सध्या मनोरुग्णालयात ५८० स्त्री व पुरुष रुग्ण उपचार घेत आहेत. परिस्थितीमुळे त्यांचा स्वत:शी मानसिक संघर्ष सुरू आहे. या संघर्षात मनोविकार तज्ज्ञांसोबत आवश्यक सोयीसुविधांची साथ मोलाची आहे. मात्र, तोकड्या सोयींमुळे रुग्णांवर याचा परिणाम होत आहे. मनोरुग्णालयात फिजिशियन डॉक्टर असतानाही रोज पाच-सहा रुग्ण मेडिकलमध्ये उपचारासाठी पाठविले जातात. रुग्णालयाकडे एकच अ‍ॅम्ब्युलन्स आहे. यात जास्तीतजास्त सहा जण बसू शकतील, अशी सोय आहे. परंतु चार-पाच रुग्णांसोबत तेवढेच अटेंडंटस् आणि एक स्टाफ नर्स असे मिळून १० ते ११ जण बसतात. यातच अटेंडंटस् स्वत: सीटवर बसून रुग्णांना खाली बसवितात. रुग्णांना अक्षरश: कोंबून हा प्रवास होतो. विशेष म्हणजे, मागील अनेक वर्षांपासून हा जीवघेणा प्रवास सुरू आहे. यासंदर्भात दोन वर्षांपूर्वी मोठ्या अ‍ॅम्ब्युलन्सचा प्रस्ताव आरोग्य विभागाला पाठविण्यात आला. परंतु अद्यापही याला मंजुरी मिळू न शकल्याने याचा फटका रुग्णांना बसत आहे. (प्रतिनिधी)