रायगड : राष्ट्रवादी कॉंग्रेसने केलेले टॅब घोटाळ्याचे सर्व आरोप केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी फेटाळून लावले. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी मंगळवारी गीते यांनी २०० कोटी रु पयांचा टॅब घोटाळा केल्याचा आरोप केला होता. त्यामुळे संतप्त झालेल्या गीते यांनी बुधवारी रोहा येथील शिवसेनेच्या मेळाव्यात आपल्या भावना व्यक्त केल्या. आयुष्यभर घोटाळे व भ्रष्टाचार केलेल्यांनी मी घोटाळा केला, हे सांगण्यासाठी भाड्याचे तट्टू अलिबागला बोलावले, असे नामोल्लेख न करता सुनील तटकरे आणि नवाब मलिक यांचा समाचार घेतला. तसेच सार्वजनिक जीवनात कुठलाही साधा डाग आपण आजवर लागू दिलेला नाही, हे सांगितले. यावेळी आकांक्षा ट्रस्टला ५००० टॅब उपलब्ध करून देणाऱ्या भारत हेवी इलेक्ट्रिकलचे सीएमडी अतुल सोबती हे व्यासपीठावर उपास्थित होते. (वार्ताहर)
टॅब घोटाळ्याचा आरोप अनंत गीतेंनी फेटाळला रोहा
By admin | Updated: October 13, 2016 05:50 IST