शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

बळीराजासाठी झटणारा ‘आनंद’

By admin | Updated: August 26, 2014 01:01 IST

ज्या वयात लोक आधार शोधतात, त्या वयात नागपुरातील एक दाम्पत्य शेतकऱ्यांचा आधार बनले आहे. शेतकऱ्यांसाठी त्यांनी केलेले कार्य समाजाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारे आहे.

दर महिन्याला शेतकऱ्यांना मदत : अपेक्षा केवळ आत्महत्या थांबाव्यातनागपूर : ज्या वयात लोक आधार शोधतात, त्या वयात नागपुरातील एक दाम्पत्य शेतकऱ्यांचा आधार बनले आहे. शेतकऱ्यांसाठी त्यांनी केलेले कार्य समाजाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारे आहे. आनंद व माधवी सोवनी असे या दाम्पत्याचे नाव असून, पेन्शनमधून मिळालेल्या रकमेतून ते दर महिन्याला पीडित शेतकऱ्यांना २००० रुपयांची मदत करीत आहे.विदर्भात शेतकऱ्यांची आत्महत्या हा विषय अतिशय गंभीर आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवर राजकारण करताना आपण बघतो, त्यातून स्वत:ची पोळी शेकण्याचा अनेक जण प्रयत्न करतात. मात्र त्यांना प्रत्यक्ष मदत करण्यासाठी कुणीही पुढे येत नाही. करोडो रुपयांची संपत्ती गोळा करूनही, शेतकऱ्यांना मदत करण्याची दानत कुणाचीही दिसत नाही. मात्र नागपुरातील ७२ वर्षीय आनंद सोवनी या संवेदनशील वृद्धाला जगाच्या पोशिंद्याच्या होणाऱ्या आत्महत्या बोचतात. शेतकऱ्यांची अवस्था त्याला बघवत नाही. त्यामुळे अशा पीडित शेतकऱ्यांना आपल्या मिळकतीतून काही मदत ते दर महिन्याला करतात. करोडो कमावल्यानंतरही शेतकऱ्यांसाठी एक रुपया देण्याची ज्यांची दानत नाही, तिथे हे दाम्पत्य दर महिन्याला आपल्या पेन्शनमधून २००० रुपयांची मदत शेतकऱ्यांना करतात. २००४ पासून त्यांनी हे अभियान हाती घेतले आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या शेतकऱ्यांच्या अवस्थेवर आधारित ‘असूड’ या पुस्तकातून प्रभावित झालेले सोवनी हे वृत्तपत्रातील शेतकऱ्यांच्या अवस्थेविषयीच्या बातम्या वाचून अतिशय अस्वस्थ व्हायचे. पोटासाठी संघर्ष करणाऱ्या भिकाऱ्याला, अपंगाला आत्महत्या का कराविशी वाटत नाही. उद्योजक, व्यापारी, नोकरदार का आत्महत्या करीत नाही. शेतकरीच का आत्महत्या करतो, या प्रश्नाचे उत्तर शोधण्यात ते अस्वस्थ व्हायचे. शेवटी त्यांनी स्वत:च शेतकऱ्यांना मदत करण्याचा निर्णय घेतला. २६ मार्च २००४ रोजी त्यांनी पहिला मनीआॅर्डर आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना पाठविला आणि तेव्हापासून दर महिन्याला ते मनीआॅर्डर करून शेतकऱ्यांना मदत करीत आहेत. आजपर्यंत त्यांनी २८६ शेतकऱ्यांना १,६०,००० रुपयांची मदत केली आहे. शेतकऱ्यांची माहिती गोळा करण्यासाठी ते वर्तमानपत्राच्या कात्रणाची मदत घेतात. वर्तमानपत्राच्या कात्रणातून पीडित, दु:खी, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या घरचा पत्ता ते शोधतात. त्यांच्या डायरीत आत्महत्या केलेल्या व गंभीर परिस्थिती असलेल्या ६६८० शेतकऱ्यांची माहिती नमूद आहे. आजपर्यंत केलेल्या मदतीची पोचपावती त्यांच्याकडे आहे. याशिवाय हे दाम्पत्य अनाथ, अपंग संस्थेलाही मदत करतात. आपल्या पेन्शनमधून ५१ टक्के हिस्सा मदतीसाठी काढून ठेवतात. दररोज आनंद सोवनी बिस्किटांचे पुडे रस्त्यावर काम करणाऱ्या मजुरांच्या मुलांना वाटतात. यासाठी त्यांना काटकसर करावी लागते, मात्र त्यांना याचे समाधान आहे. आपण जिवंत असेपर्यंत हे कार्य अव्याहतपणे करणार असल्याचा वसा त्यांनी घेतला आहे. आदर्श जीवन जगतातआपल्या घासातील घास इतरांसाठी ठेवताना, त्यांना काटकसर करावी लागते. अतिशय साधे जीवन ते जगतात. आजही त्यांच्या घरातील टीव्ही रिमोटलेस आहे. त्यांनी केबल लावलेला नाही. घरातील फर्निचरही जुनेच आहे. कुठलेही अत्याधुनिक विद्युत उपकरणे त्यांच्या घरात नाही. स्वत:चे वाहन नाही, दोघांजवळ एकच मोबाईल आहे. विजेचा वापर ते काटकसरीने करतात. इनव्हरर्टर न लावण्यामागे त्यांची भावना अतिशय व्यापक आहे, ते म्हणतात, गावातील शेतकरी दिवसभर विजेविना राहू शकतो, आपण साधे तीन तास सहन करू शकत नाही. साधे खानपान, साधी राहणी त्यांची आहे. यासाठी त्यांची पत्नी माधवीचे त्यांना पूर्ण सहकार्य आहे. विशेष म्हणजे त्यांची मुले अमेरिकेत आहेत. असे असतानाही कुठलीही मदत न घेता, एक आदर्श जीवन ते जगत आहेत. (प्रतिनिधी)