शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

आमुची मिराशी पंढरी! आमचे घर भीमातीरी!

By admin | Updated: July 7, 2014 03:32 IST

कर कटेवर ठेवून युगे अठ्ठावीस विटेवर उभा असलेल्या सावळ्या विठ्ठलाच्या दर्शनओढीने पंढरीत तीन लाख भाविक दाखल झाले असून, पददर्शन रांग नऊ पत्राशेड भरून पुढे गेली आहे

जगन्नाथ हुक्केरी, पंढरपूर‘आमुची मिराशी पंढरी। आमुचे घर भीमातीरी।।१।।पांडुरंग आमुचा पिता। रखुमाई आमची माता।।२।।भाऊ पुंडलिक मुनी। चंद्रभागा आमुची बहीण।।३।। तुका जुनाट मिराशीं। ठाव दिला पायांपाशीं।।४।।’कर कटेवर ठेवून युगे अठ्ठावीस विटेवर उभा असलेल्या सावळ्या विठ्ठलाच्या दर्शनओढीने पंढरीत तीन लाख भाविक दाखल झाले असून, पददर्शन रांग नऊ पत्राशेड भरून पुढे गेली आहे. यामध्ये ८० हजार भाविक दर्शनासाठी थांबले आहेत; तर मुखदर्शन रांगही तुकाराम भवनाच्या पाठीमागे गेली आहे. वाळवंटात दाखल झालेले भाविक हरिजागरात तल्लीन झाले असून, हा सोहळा संपेपर्यंत वारकऱ्यांचे घर असलेल्या भीमातीरावर भक्तीचा सूर निनादणार आहे.खेळ, धावा, रिंगण असा खेळ खेळत पंढरी समीप आल्याच्या आनंदाने ‘आनंदाच्या डोही आनंद तरंग’ असे म्हणत वारकऱ्यांनी पंढरीचे आदरातिथ्य स्वीकारत विठुरायाच्या पावन तालुक्यात प्रवेश केला. पालख्या पंढरीत दाखल होणार असल्याने पालख्यांसोबतचे वारकरी आधीच पंढरपूर गाठून दर्शनासाठी पददर्शन रांगेत थांबत आहेत. एका भाविकाला पददर्शनासाठी आठ ते साडेआठ तास कालावधी लागत असल्याचे हादगाव (ता. केज, जि. बीड) येथील युवराज नामदेव यादव, राणाण्णा संताजी कोंडरू (रा. पिंपळा, ता. बिलोली, जि. नांदेड) यांनी सांगितले.ज्ञानोबा भंडीशेगाव तर तुकोबा पिराची कुरोली येथील मुक्काम आटोपून सोमवारी वाखरीकडे रिंगण, खेळ, धावा करीत निघणार आहेत. पालख्या पंढरपूर समीप आल्याने भाविकांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत असून, चंद्रभागेत पाणी आल्याने पवित्र स्नान करण्यासाठी भाविकांची मोठी लगबग सुरू झाली आहे.