शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

‘अमृत’ योजना; ८७ कोटींच्या निविदेचे दर कमी करण्याची सूचना

By admin | Updated: March 3, 2017 02:05 IST

सहा टक्के दर परवडणारे नाहीत!

अकोला, दि.२ : ‘अमृत’ योजनेंतर्गत पाणीपुरवठा वितरण प्रणालीच्या कामांसाठी महापालिकेच्या स्थायी समितीने ६ टक्के जादा दराने मंजूर केलेली निविदा परवडणारी नाही. ‘एपी अ‍ॅन्ड जीपी असोसिएट्स’ कंपनीने किमान ४.७५ दराने निविदा सादर केल्यास विचार केला जाईल, असे पत्र महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, मुंबई विभागाने जारी केले आहे. मजीप्राची भूमिका पाहता कंपनी दर कमी करते किंवा नाही, यावर योजनेचे भवितव्य अवलंबून आहे. शहराची पाणीपुरवठा यंत्रणा सुरळीत करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने ‘अमृत’योजनेत शहराचा समावेश केला. पाणीपुरवठा यंत्रणा कार्यान्वित केल्यानंतर भूमिगत गटार योजनेला सुरु वात केली जाईल. पाणीपुरवठा योजनेसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने तयार केलेल्या २५४ कोटींच्या ‘डीपीआर’(प्रकल्प अहवाल) मधील ११० कोटी ८४ लाखांच्या प्रस्तावाला शासनाच्या तांत्रिक मूल्यमापन समिती व उच्चाधिकार समितीने मंजुरी दिली. महापालिका आयुक्त अजय लहाने यांनी ८७ कोटी ३५ लाखांच्या कामाची निविदा प्रकाशित केली. एपी अ‍ॅन्ड जीपी असोसिएट्स कंपनीची ६ टक्के ज्यादा दराची निविदा मनपाला प्राप्त झाली. मनपाच्या स्थायी समिती सभेने निविदेला मंजुरी दिल्यानंतर शासनाच्या तांत्रिक मूल्यमापन समिती व उच्चाधिकार समितीकडे अंतिम मंजुरीसाठी निविदा सादर करण्यात आली. यासंदर्भात नगर विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर निर्णय घेतील. यादरम्यान कंपनीने सादर केलेली ६ टक्के जादा दराची निविदा परवडणारी नसल्यामुळे की काय, मुंबई येथील मजीप्राने कंपनीला ४.७५ टक्के दराने निविदा सादर करण्याचे पत्र दिल्याची माहिती आहे. मजीप्राचा प्रस्ताव कंपनीने मान्य केल्यास पाणीपुरवठा योेजनेला सुरुवात होईल. अन्यथा पुन्हा एकदा प्रशासनाला ई-निविदा बोलवावी लागेल, असे दिसून येते. १० कोटींचे काम कधी पूर्ण होईल?२०१२ मध्ये मनपातील तत्कालीन सत्ताधारी काँग्रेस-राकाँच्या कालावधीत मूलभूत सोयी-सुविधांसाठी मनपाला २८ कोटींचा निधी प्राप्त झाला होता. १२ कोटी रुपये जलप्रदाय विभागाच्या माध्यमातून पाणीपुरवठा यंत्रणा सुरळीत करण्यासाठी तरतूद करण्यात आले. प्रशासनाने ११ कोटी ८४ लक्षची निविदा प्रक्रिया राबवली. १० कोटींचे काम ‘एडीसीसी’ कंपनीला सोपवण्यात आले. सदर काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.