शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

अन्नत्याग आंदोलन लोकचळवळ व्हावी- अमर हबीब

By admin | Updated: March 19, 2017 18:02 IST

अन्नत्याग आंदोलनं आता लोकचळवळ व्हावी, असे मत आंदोलनाचे प्रणेते अमर हबीब यांनी व्यक्त केले.

ऑनलाइन लोकमतयवतमाळ, दि. 19 - शेतकऱ्यांच्या आत्महत्या महाराष्ट्रातील कोणत्याच घटकासाठी भूषणावह नाहीत, देशाचा पोशिंदाच जर खचत गेला तर समाजात भयान परिस्थिती निर्माण होईल, त्याची पावले आपण ओळखली पाहिजे. शेतक-याचं दुःख समजून घेऊन अन्नत्याग आंदोलनं आता लोकचळवळ व्हावी, असे मत आंदोलनाचे प्रणेते अमर हबीब यांनी व्यक्त केले. ते महागाव येथे स्व. साहेबराव पाटील करपे यांना श्रद्धांजली अर्पण करताना बोलत होते. महागाव येथे बस स्थानकासमोर हजारो समर्थकासह एक दिवसाच्या अन्नत्याग आंदोलनाला बसले आहेत.साहेबराव करपे आणि त्यांच्या कुटुंबीयांना श्रद्धांजली अर्पण करून पुष्पहार घालताना मा. रविकांत तुपकर, अमर हबीब , डॉ. विश्वनाथ विनकरे, देवेंद्र भुयार, सुरेश रोहणेकर, शरद पाटील, जगदीश नरवाडे, नगराध्यक्ष सुनील नरवाडे, उदय नरवाडे, प्रा. विलास भवरे, योगेश वाजपेयी, माजी जि. प. अध्यक्ष भाऊराव चौधरी, संदीप ठाकरे, प्रमोद भरवाडे, शैलेश कोपरकर , संभाजीराव नरवाडे, गजेंद्र देशमुख, गजानन नांदेकर कास्ट्राईब संघटनेचे तालुकाध्यक्ष, महेंद्र कावळे , विशाल पांडे , अशोक तुमवार, अ‍ॅड. विवेक देशमुख, मनीष जाधव, विनोद पाटील, गोपाल चव्हाण, सतीष चव्हाण , प्रशांत ठाकरे, प्रदीप पाटील, मुकेश टापरे, शुभम मुंडवाईक, मिथुल अलाटे, गौरव नाईकर, सुधाकर जाधव, पुरुषोत्तम राठोड, नगरसेवक नारायण शिरबिरे, रामचंद्र तंबाखे व असंख्य शेतक-यांसह नागरिक या आंदोलनात उपस्थित होते, तर या कार्यक्रमादरम्यान सर्व आंदोलकांना काळी रिबीन बांधून शेतकरी विरोधी कायद्याचा निषेध केला, तर सर्वांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.साहेबराव करपे पाटील यांचे पुत्र साहेबराव करपे पाटील यांचे मूळगाव चिलगव्हाण येथे गावक-यांनी चुलबंद ठेवून काळ्या रांगोळ्या काढल्या, सरपंच पंजाबराव पारध, माजी सभापती नरेंद्र खंदारे यांच्यासह गावक-यांनी मंदिरासमोर बसून अन्नत्याग केला. दिवसभर महागाव आणि चिलगव्हाण येथे अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या आणि करपे कुटुंबापरी आणि शेतकऱ्यांसाठी शासन राबवत असलेल्या धोरणावर संवेदना व्यक्त केल्या.  आंदोलनाचे वैशिष्ट्य शेतकरी आणि त्या अनुषंगाने शेतकऱ्यांसाठी झटणारे त्यांच्या संघटनाचे प्रतिनिधी महिला आवर्जून उपस्थित होत्या.